Home /News /pune /

पुण्यात ससून रुग्णालयाच्या परिसरात धक्कादायक प्रकार, महिला डॉक्टरने समोर आणली घटना

पुण्यात ससून रुग्णालयाच्या परिसरात धक्कादायक प्रकार, महिला डॉक्टरने समोर आणली घटना

पुण्यातील डॉक्टर मानसी पवार यांनी हा प्रकार उघडकीस आणाला आहे.

पुणे, 25 जुलै : कोरोनाचं (Coronavirus) संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असतानाच पुणे (Pune) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक वयस्कर रुग्ण चक्कर येऊन धडपडत होता आणि रुग्णालयात भर्ती होण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र ससून रुग्णालयाच्या परिसरातील या रुग्णाला बराच वेळ कोणीही रुग्णालयात घेऊन गेलं नाही. पुण्यातील डॉक्टर मानसी पवार यांनी हा प्रकार उघडकीस आणाला आहे. कामासाठी ससून हॉस्पिटलमध्ये आलेल्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाच्या धडपडीकडे लक्ष गेलं आणि त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना त्या रुग्णाला मदत करण्यास आणि रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. पण या कर्मचाऱ्यांनी हे आमचं काम नाही म्हणत सपशेल नकार दिला. मानसी पवार यांनी हा प्रकार त्यांच्या फेसबुकद्वारे सर्वांसमोर आणला आणि याला कोण जबाबदार? असा सवाल विचारला आहे नेमकं काय घडलं? 'एक रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी धडपड करताना दिसला. तो आजारी होता आणि चालूही शकत नव्हता. रुग्णालय परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांना तो रुग्ण बाहेर थांबला असल्याचं सांगत दुर्लक्ष केलं. वास्तविक त्या रुग्णाच्या हातात एक कागद होता आणि त्यावर 22 जुलैचा उल्लेख होता. त्याला रुग्णालयात अॅडमिट व्हायचं होतं. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही त्याची मदत केली नाही. काही कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विचारला असता त्यांनी हे आमचं काम नसल्याचं सांगितलं. संबंधित कर्मचारी आणि स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. संबंधित कर्मचारी आल्यानंतर या रुग्णाला घेऊन जातील, तोपर्यंत तो इथेच राहील, असं सांगत त्यांनी मला तिथून जायला सांगितलं,' असं म्हणत डॉ. मानसी पवार यांनी ससून रुग्णालय परिसरातील ही घटना सांगितली आहे. तसंच याला जबाबदार कोण? असाही प्रश्न मानसी पवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, याआधीही पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणण्याऱ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासन, प्रशासनाला जाग कधी येणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या