अनिस शेख, प्रतिनिधी
खंडाळा, 29 जून : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आजचा दिवस अपघाताचा वार ठरला आहे. आज पहाटे घडलेल्या भीषण अपघातानंतर खंडाळा घाटात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
खंडाळा घाटात जुन्या अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. पुण्यातील पोलीस कर्मचारी मुंबईकडे येत होते. त्यावेळे अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि महामार्गाच्या मधोमध गाडी पलटी झाली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. तर तीन जण सुखरूप आहे. सुमो गाडी पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त सुमो गाडी महामार्गावरून हटवण्यात आली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पोलीस वाहनाचा अपघात, मुंबईकडे जाताना भरधाव वाहन पलटले pic.twitter.com/NzufX3AfkL
— News18Lokmat (@News18lokmat) June 29, 2020
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. खालापूर टोल नाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट तसेच टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जगात पाऊल ठेवताच बाळाला कोरोनाने गाठले, आईलाही झाली लागण
या अपघातात स्विफ्ट कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून अपघातग्रस्त ट्रेलर तसंच एक टेम्पो महामार्गावर आडवा पडला होता. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणा तसंच आयआरबी हे घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवले.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.