मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जगात पाऊल ठेवताच बाळाला कोरोनाने गाठले, आईलाही झाली लागण

जगात पाऊल ठेवताच बाळाला कोरोनाने गाठले, आईलाही झाली लागण

 शासकीय रुग्णालयात असलेल्या प्रसूती गृहातील एकूण दोन महिलांना कोरोनाची झाली आहे.

शासकीय रुग्णालयात असलेल्या प्रसूती गृहातील एकूण दोन महिलांना कोरोनाची झाली आहे.

शासकीय रुग्णालयात असलेल्या प्रसूती गृहातील एकूण दोन महिलांना कोरोनाची झाली आहे.

    रत्नागिरी, 29 जून : महाराष्ट्रात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. कोकणातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक, म्हणजे, जन्मजात बाळालाही कोरोनाची लागण झाली.

    रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या 580 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग तर वाढतच आहे. पण शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

    शासकीय रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दोन महिला रुग्णालयात दाखल झाल्या होत्यात. त्यापैकी एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली. पण, त्यानंतर आई आणि जन्मजात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

    सलग दुसऱ्या दिवशी समोर आली कोरोनाची मोठी आकडेवारी, वाचा लेटेस्ट अपडेट

    शासकीय रुग्णालयात असलेल्या प्रसूती गृहातील एकूण दोन महिलांना कोरोनाची झाली आहे.  पण नुकत्याच जन्म झालेल्या बाळांना ही कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन्ही माय लेकरांवर कोरोनाचा उपचार सुरू आहे. त्यांना कोविडच्या विशेष वार्डमध्ये हलवण्यात आले आहे.

    हॉस्पिटल आहे की नोटांचा छापखाना? फक्त PPE कीटसाठी आकारले 27 हजार रुपये बिल!

    रत्नागिरीत गेल्या 24 तासामध्ये 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात  रत्नागिरी 8, कळंबणी 7, कामथे 7, संगमेश्वर 1 आणि  लांजा इथं 1 रुग्ण आढळून आला आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात 580 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

    संपादन - सचिन साळवे

    First published:

    Tags: Baby, Kokan, Mother