• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Pune News: ...अन् आई-भावानं डोळ्यादेखत सोडले प्राण; एका क्षणात हरपलं 3 वर्षाच्या चिमूरडीचं विश्व

Pune News: ...अन् आई-भावानं डोळ्यादेखत सोडले प्राण; एका क्षणात हरपलं 3 वर्षाच्या चिमूरडीचं विश्व

Pune News: एका दुर्दैवी घटनेत आपली आई आणि दीड वर्षाचा लहान भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं एका 3 वर्षाच्या चिमूरडीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 • Share this:
  पुणे, 09 मे: आपली आई आणि दीड वर्षाचा लहान भाऊ एवढंच विश्व असणाऱ्या एका 3 वर्षाच्या चिमूरडीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी एका भरधाव कारने धडक दिल्यानं एका भिक्षेकरी महिलेसह (car hits beggar woman and her child) तिच्या दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Mother and brother death) झाला आहे. या अपघातातून संबंधित मृत महिलेची तीन वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली आहे. अचानक कारने जोरदार टक्कर मारल्यानं या 3 वर्षाच्या मुलीचं सारं विश्वच हिरावून नेलं आहे. ही घटना गुरुवारी दुपारी पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. संबंधित मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिचं वय अंदाजे 35 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला गुरुवारी दुपारी कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील कमानीजवळ भीक मागत होती. यावेळी तिच्या झोळीत तिचा दीड वर्षाचा मुलगा देखील होता. तर तीन वर्षाची मुलगीही आसपासचं हुंदडत होती. यावेळी आलेल्या एका भरधाव कारने संबंधित महिलेला आणि बाळाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर बाळ गंभीर जखमी झालं. हे वाचा-शेजारणीचा फोटो मित्रांना पाठवला, पंचायतीने तरुणांसोबत केला धक्कादायक प्रकार यावेळी आरोपी कारचालक श्रेयस कुरले यानं तातडीनं बाळाला भारती रुग्णालयात दाखल केलं. मात्र बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण दुसरीकडे एका क्षणात पोरक्या झालेल्या या तीन वर्षाच्या मुलीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. अपघातानंतर ही तीन वर्षांची मुलगी तिथेच एका चौकात रडत बसली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संबंधित मुलीला सोफोश संस्थेत दाखल केलं आहे. हे वाचा-लॉकडाऊनमध्ये पालक घरात तर मुलं बाहेर; खेळताना कारमध्ये श्वास गुदमरल्याने मृत्यू संबंधित महिलेची अद्याप ओळख पटली असून पोलीस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक  विशाल कांबळे यांनी आरोपी कारचालक श्रेयस कुरले याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. तसेच मृत महिलेची कोणतीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलीसांना संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: