लखनऊ, 7 मे : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शुक्रवारी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चांदीनगर भागात सिगौली तगा गावात एका कारमध्ये श्नास गुदमरून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
या सर्व मुलांचे वय 4 ते 8 वर्षे इतकी होती. मृत झालेल्यांंमध्ये 4 वर्षांची वंदना, अक्षय, 7 वर्षांचा कृष्णा आणि 8 वर्षांच्या नियतीचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं खेळत असताना घराच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसले होते. ऑटोलॉक झाल्यामुळे गेट बंद झाला. या प्रकरणात कुटुंबीयांनी कार मालकावर निष्काळजीपणाचा आरोप लालला आहे. पोलिसांनी मृत मुलांचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
हे ही वाचा-Pune: बहिणीच्या 3 वर्षाच्या मुलाला संपवलं; अनैतिक संबंधातून पाण्यात बुडवून हत्या
ही घटना दुपारची आहे. कडक ऊन असल्या कारणाने मोठी माणसं घराच्या आत बसली होती. अनेक घरातील मुलं बाहेर खेळत होती. मुलं कारमध्ये बसली आणि आतून गेट ऑटोलॉक झाला. कडक ऊन असल्याने गाडीच्या आत उष्णता वाढली आणि श्वास गुदमरल्यामुळे 4 मुलांचा मृत्यू झाला. एका मुलाला गंभीर परिस्थितीत पोलिसांनी कारमधून बाहेर काढलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी गावातील हॅप्पी पूत्र राजकुमार याची आहे. मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप लावला आहे की, ही घटना कारच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे झाली असून या प्रकरणात कारच्या मालकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सिव्हील रुग्णालय लखनऊचे डॉ. एनबी सिंह यांचं म्हणणं आहे की, उन्हाळ्यात दिवसात अधिक काळापर्यंत गाडी उन्हात उभी असल्याने गाडीतील तापमान वाढलं. अशात जर कारचं गेट ऑटोलॉक झाला तर तेथे श्वास गुदमरू लागतो. गेट बंद असल्याने आत ऑक्सीजन मिळत नाही. त्यामुळे श्वास गुदमरतो. मात्र पोस्टमार्टमनंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Small child, Uttar pradesh