Home /News /crime /

शेजारणीचा फोटो मित्रांना पाठवला, संतापलेल्या पंचायतीने गावासमोर तरुणांसोबत केला धक्कादायक प्रकार

शेजारणीचा फोटो मित्रांना पाठवला, संतापलेल्या पंचायतीने गावासमोर तरुणांसोबत केला धक्कादायक प्रकार

याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

    नोएडा, 8 मे : ग्रेटर नोएडाच्या दादरी भागातील नव्या कॉलनीत पंचायत बोलालूव तरुणांना चपलांची माळा घालणे आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींनी गावात पंचायत बोलावली होती. यात दोन तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं होतं. पंचायतीत दोन्ही तरुणांना चपलांचा हार घालण्यात आला. याशिवाय त्यांना मारहाणही केली गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ग्रेटर नोएडाच्या दादरी भागात 3 मे रोजी पंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी दोन तरुणांवर शेजारी राहणाऱ्या तरुणीचे फोटो घेतला आणि फोटोशॉपच्या मदतीने छेडछाड करीत आपल्या मित्रांना पाठवले. हे प्रकरण मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. हे ही वाचा-प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू यानंतर पंचायत बोलावण्यात आली. त्यांनी या प्रकरणात पोलिसांना बोलावण्याऐवजी पंचायतीने स्वत:च निर्णय घेतला. आणि तरुणांना मारहाण केली व त्यांना चपलेचा हार घातला. इतकच नाही पंचायतीचा हा व्हिडिओ तयार करू सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती मिळाली, त्यांनी आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये एक शिक्षकाचाही समावेश आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या