Home /News /pune /

16 वर्षाच्या पुणेकर मुलाने Click केले चंद्राचे भन्नाट फोटो, मनासारखा फोटो मिळण्यासाठी 50 हजारांहून जास्त Click

16 वर्षाच्या पुणेकर मुलाने Click केले चंद्राचे भन्नाट फोटो, मनासारखा फोटो मिळण्यासाठी 50 हजारांहून जास्त Click

प्रथमेश जाजूने चंद्राचे चांगले फोटो मिळण्यासाठी 50 हजारांहून अधिक फोटो क्लिक केले.

  पुणे , 20 मे :  नासा (Nasa) आणि इस्रो (Isro) सारख्या अंतराळ संशोधन संस्थांनी चंद्राची(Moon)अनेक सुंदर सुंदर छायाचित्र समोर आणली आहेत. पण पुण्याच्या (Pune) राहणाऱ्या एका 16 वर्षाच्या तरुणानं चंद्राचे असे काही फोटो क्लिक केले आहेत, की सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. पुण्याचा राहणारा प्रथमेश जाजू (Prathamesh Jaju)याने काढलेले चंद्राचे फोटो पाहून त्यानं फार जवळून फोटो घेतल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर त्यानं काढलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत. (वाचा-VIDEO: पाणी कधी, केव्हा आणि कसं प्यावं? पाहा प्राजक्ता माळीनं दिलेल्या खास टीप्स) प्रथमेशने चंद्राचे हे फोटो क्लिक करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. चंद्राचे हे अत्यंत सुंदर आणि रंगीत फोटो क्लिक करणाऱ्या प्रथमेशने 50 हजारांहुन अधिक फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो स्टोर करण्यासाठी त्याला 186 GB डेटाचा वापर करावा लागला आहे. प्रथमेशला अॅस्ट्रोफिजिस्ट म्हणजे खगोल श्स्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे, असं त्यानं सांगितलं आहे. पण सध्या अॅस्ट्रोफोटोग्राफी करणं हा त्याचा छंद आहे, असंही तो सांगतो.
  प्रथमेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याने 3 मे च्या रात्री 1 वाजेच्या सुमारास हे फोटो क्लिक केले होते. त्याने सांगितले की, 4 तासांपर्यंत व्हिडिओ आणि फोटो कॅप्चर केले होते. या दरम्यान त्याने 50 हजारांहून अधिक फोटो क्लिक केले आणि ते प्रोसेस करण्यासाठी त्याला 38 चे 40 तास लागले. प्रथमेशने सांगितले की, त्याने सर्व फोटो एकत्र स्टिच केले आणि फोटोतील बारकावे दिसावे यासाठी फोटो अधिक शार्प केले. प्रथमेशने सांगितलं की, तो जेव्हा फोटो घेत होता, त्यावेळी त्याच्याकडे फोटोचा रॉ डेटा जवळपास 100 जीबीचा होता. पण त्याने त्यावर प्रोसेस केल्यानंतर त्याची साईझ वाढून 186 जीबी एवढी झाली. (वाचा- चिंतेत भर! कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचा हल्ला, वाचा लक्षणं) प्रथमेशने सांगितलं की, त्यानं चंद्राचे फोटो घेण्यासाटी अनेक आर्टिकल वाचले. तसेच यूट्यूबवर अनेक व्हिडिओ देखिल पाहिले. या दोन्हीवर त्याला फोटो कॅप्चर करण्याबाबत आणि त्यानंतर त्यावर प्रोसेसिंग करण्याबाबत भरपूर माहिती मिळाली. प्रथमेशने  3डी इफेक्ट देण्यसाठी क्लिकल केलेल्या दोन वेगळ्या फोटोंचं एचडीआर कंपोसाइट तयार केलं. हा थर्ड क्वॉर्टर मिनरल मून चा त्याचा अगदी बारकावे दिसणारा सर्वात स्पष्ट शॉट आहे, असंही तो म्हणाला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Moon, Photography, Pune

  पुढील बातम्या