मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चिंतेत भर! कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचा हल्ला, वाचा लक्षणं

चिंतेत भर! कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचा हल्ला, वाचा लक्षणं

आतापर्यंत कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगस (Black Fungus) होत असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता कोरोना रुग्णांमध्ये व्हाईट फंगसची (White Fungus) समस्याही उद्भवू लागली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

पटना 20 मे: कोरोनानं भारतासह संपूर्ण जगामध्ये अक्षरशः हाहाकार घातला आहे. अशातच कोरोना रुग्णांना (Corona Patients) होणाऱ्या वेगवेगळ्या अन्य आजारांच्या लक्षणांमुळे डॉक्टरांसोबतच रुग्णांच्या चिंतेतही भर पडली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगस (Black Fungus) होत असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता कोरोना रुग्णांमध्ये व्हाईट फंगसची (White Fungus) समस्याही उद्भवू लागली आहे. पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (PMCH) दाखल असलेल्या कोरोनाच्या चार रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

महाराष्ट्राने देशाला दिल्या 3 गोष्टी, COVID विरोधात राज्य ठरलं Game Changer!

पीएमसीएचच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉक्टर एसएन सिंह यांनी कोरोना रुग्णांमध्ये व्हाईट फंगस आढळल्याची माहिती दिली आहे. हा फंगस रुग्णांच्या त्वचेवर परिणाम करत आहे. याचं निदन उशिरा झाल्यास यामुळे रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. डॉ. एसएन सिंह यांनी कोरोनाचे रुग्ण आणि यातून बऱ्या झालेल्यांना व्हाईट फंगसला गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे 'ही' लोकं कारणीभूत, ICMR चा मोठा खुलासा

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी चोवीस तासात याठिकाणी 3846 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतंकच नाही तर याठिकाणी पाच एप्रिलनंतर पहिल्यांदाच इतकी कमी रुग्णसंख्या आढळली आहे. पॉझिटिव्हिटी रेटही घटला असून तो 5.78 टक्के झाला आहे. मात्र, ब्लॅक फंगसनं (Black Fungus) दिल्ली सरकारची चिंता वाढवली आहे. ब्लॅक फंगसची (Mucormycosis) दिल्लीमध्ये 185 प्रकरणं आढळली आहेत. यामुळे केजरीवाल सरकारसोबतच केंद्र सरकारची चिंताही वाढली आहे. सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 61 आणि सर गंगाराम रुग्णालयात 69 ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Corona patient, Corona spread, Corona updates