मुंबई, 20 मे- मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) नुकताच चाहत्यांसाठी एक अत्यंत उपयोगी व्हिडीओ (Video) शेयर केला आहे. यामध्ये प्राजक्ताने पाणी पिण्याविषयी अत्यंत महत्वाची (Benefits Of Drinking Water) माहिती सांगितली आहे. पाणी कसं, कधी आणि कुठे प्यावं याबद्दल तिने सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती आपल्या आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची अशी आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीचं चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहमीच ती चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ शेयर करत असते. नुकताच प्राजक्ताने आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये तिने पाणी पिण्याच्या पद्धती आणि त्याचे फायदे सांगितले आहेत.
पाणी कधी, केव्हा आणि कसं प्यावं- प्राजक्ता माळीने आपल्या या व्हिडीओ मध्ये पाणी पिण्या संदर्भातील चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
बहुतांश लोकांना हे माहिती नसेल, की पाणी नेहमी बसून प्यावं. प्राजक्ताने सुद्धा हेच सांगितल आहे. प्राजक्ता म्हणते, ‘उभं राहून पाणी पिल्याने पोट फुगतो, अर्थातच पोटाला ढेरी येते. शिवाय त्याने उतारवयात गुडघेदुखी आणि टाचदुखी सुद्धा सुरु होते. आणि यावर कोणताही डॉक्टर इलाज करू शकत नाही, इतकी ती भयानक असते.
View this post on Instagram
पाणी नेहमी सकाळी उठल्या उठल्या चूळ न भरता किंवा ब्रश न करता प्यावं. आणि कोमट पाणी किंवा लिंबू पाणी घेणं अगदी उत्तम आहे. रात्रभर आपल्या तोंडात एक प्रकारची लाळ तयार झालेली असते. ही लाळ एक प्रकारची औषधीय असते. त्यामुळे आपल्या शरीराला खुपचं फायदा मिळतो. म्हणून सकाळी तोंड न धुता पाणी प्यावं असं प्राजक्ता म्हणते.
(हे वाचा: सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट लवकरच येतोय; 'दिठी'चा ट्रेलर प्रदर्शित )
जेवायच्या आधी 10 मिनिटे आणि जेवल्यानंतर 45 मिनिटांनी पाणी प्यावं, यापाठीमागे शास्त्रीय करण असल्याचं प्राजक्ता म्हणते, आपण प्रत्येक घास 32 वेळा चावून खावं असं आयुर्वेद सांगत. मात्र आपण तस करत नाही. आणि त्यामुळे अर्धवट चावलेल अन्न आपल्या शरीरात जातं. मात्र जठरमध्ये हे अन्न बारीक केलं जातं. आणि त्यामुळे आपण जर लगेच पाणी प्यायलो तर ही प्रक्रिया पुन्हा अर्धवट राहते. आणि त्यामुळे जेवणातील आवश्यक घटक शरीराला मिळत नाहीत.
(हे वाचा: जळगांवची तरुणी कशी झाली 'म्हाळसा'? पाहा मराठमोळ्या सुरभी हांडेचा अनोखा प्रवास )
रात्री झोपताना पाणी अगदी कमी पाणी प्यावं. दिवसभरात पाणी भरपूर प्यावं, मात्र संध्याकाळ नंतर पाण्याचं प्रमाण कमी करावं असं आयुर्वेदात म्हटलं असल्याचं प्राजक्ता सांगते.
प्राजक्ताचा हा व्हिडीओ आपल्या दैनदिन आयुष्यासाठी खुपचं फायदेशीर आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.