'भाऊ म्हणून दादा म्हणावं की...', मनसेच्या महिला नेत्याचा चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप

डीजे डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केलं तर कारवाई केली जाईल या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याबाबत रुपाली पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर त्यांना आता नोटीस पाठवण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 08:27 AM IST

'भाऊ म्हणून दादा म्हणावं की...', मनसेच्या महिला नेत्याचा चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप

पुणे, 12 सप्टेंबर : आज अनंत चतुर्थी असल्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. बाप्पाच्या या महाउत्सवाची सांगता करण्यासाठी मोठ्या मिरवणुकींचं आयोजन करण्यात येणार आहे. अशात बाप्पाच्या विसर्जनाला डीजे आणि डॉल्बी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण डीजे आणि डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील यांना कलम 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

डीजे डॉल्बीबाबत कायद्याचं उल्लंघन केलं तर कारवाई केली जाईल या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याबाबत रुपाली पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर त्यांना आता नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस पाठवल्यामुळे रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे सूडबुद्धीने वागत आहेत असा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे. 'चंद्रकांत दादा पाटील यांना भाऊ म्हणून दादा म्हणावं की गुंड म्हणून दादा म्हणावं' असंही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

विधानसभेत मनसे स्वतंत्र लढणार? उमेदवारीसाठी 26 नावं आघाडीवर

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचं वार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्यात भाजप आणि शिवसेनेमधली जोरदार मेघाभरती अशी लगबग सध्या विधानसभेची आहे. त्यात राज ठाकरे यांची मनसे आता स्वतंत्र लढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करू शकते, असं बोललं जात होतं. मात्र, आता मनसे या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इतर मित्रपक्षांसह मनसेलाही सोबत घेऊन महाआघाडीद्वारे शिवसेना-भाजपचा सामना करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र मनसे आता स्वतंत्र चूल मांडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आधीच बॅकफूटवर असलेल्या आघाडीला आणखी एक धक्का धक्का बसला आहे.

Loading...

इतर बातम्या - साताऱ्यात भीषण दुर्घटना, ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

मनसेच्या पहिल्या टप्यातील संभाव्य उमेदवारांची यादी

1. शिवडी - आदीत्य शिरोडकर

2. भायखळा - संजय नाईक

3. वरळी - संतोष धुरी

4. माहीम - नितीन सरदेसाई

5. विले पार्ले - संदीप दळवी

6. मागाठणे - नयन कदम

7. कलिना   - संजय तुर्डे

8.  घाटकोपर - गणेश जुग्गल

9. भांडुप - अनिषा माजगावकर

10. विक्रोळी  - नितीन नांदगावकर

11. ठाणे - अविनाश जाधव

12. कल्याण - प्रकाश भोईर

13. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील

14.डोंबिवली - राजेश कदम

15. नाशिक - राहुल ढिकले

इतर बातम्या -  चाणाक्यनीतीः बुद्धिमान माणसं या तीन गोष्टींची तक्रार कधीच करत नाहीत

16. नाशिक - अशोक मुर्तडक

17. नाशिक - सलिम शेख

18.  पुणे - वसंत मोरे

19.  वणी - राजु उंबरकर

20. पंढरपूर - दिलीप धोञे

21. पैठण - विजय चव्हाण

22. लातुर - संतोष नागरगोजे

23. हिंगोली - बंडू कुटे

24. खेड - वैभव खेडेकर

25. नागपूर  - अजित वानखेडे

26. पुरंदर - बाबा जाधवराव

दरम्यान, मनसेकडून अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास नक्की कुणाचं गणित बिघडवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तुझा विषय मीच क्लोज करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 08:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...