आसिफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 10 सप्टेंबर: हिंदू मुस्लीमांमधल्या एकतेवर अनेकदा चर्चा केली जाते. पण याचं प्रत्यक्ष उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्यात पाहायला मिळालं.गणपती बाप्पा आणि मोहरम पीर यांची एकत्रित मिरवणूक सुरू आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला जातोय. मुस्लीम तरूण करबला घेऊन गणपतीसमोर नाचत आहेत.