Home /News /pune /

पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार, दिला बाळाला जन्म

पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार, दिला बाळाला जन्म

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape on minor girl by college friend) केल्याची आणखी एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्रानं प्रेमसंबंधांतून (Love affair) एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत.

    पुणे, 14 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या (rape cases in maharashtra) अनेक घटना समोर येत आहेत. पुणे, मुंबई, ठाणे आणि अमरावती याठिकाणी बलात्काराच्या घटना उघडकीस आल्यानंतर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape on minor girl by college friend) केल्याची आणखी एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्रानं प्रेमसंबंधांतून (Love affair) एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. यातून पीडित मुलगी गर्भवती देखील राहिली आहे. पीडित मुलगी गोव्याला आपल्या नातेवाईकांकडे गेल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी गोव्यातील मापुसा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण संबंधित घटना पुण्यात घडली असल्यानं गोवा पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याकडे वर्ग केलं आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत. कुणाल पटेल असं गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचं नाव असून तो पुण्यातील फातिमानगर येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी आणि आरोपी तरुण एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हेही वाचा-नोकराला तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडले आक्षेपार्ह फोटो, 1 लाख मागत केलं ब्लॅकमेल नेमकं प्रकरण काय आहे? संशयित आरोपी कुणाल पटेल आणि 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी एकाच महाविद्यालयात शिकत होते. महाविद्यालयात शिकत असताना दोघांत प्रेमसंबंध जुळले होते. फेब्रुवारी 2019 मध्ये संशयित आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळी पीडित मुलगी गरोदर राहिली. या घटनेनंतर पीडित मुलगी गोव्यात आपल्या नातेवाईकांकडे गेली असता, संबंधित घटना उघडकीस आली आहे. हेही वाचा-National खो-खो खेळाडू Rape: हत्येपूर्वीची त्या 3 शब्दांची क्लीप पोलिसांना सापडली या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तरुणीला गर्भपात करण्याचा सल्ला दिली. मात्र तिने गर्भपात न करता मुलाला जन्म देऊन त्याचा सांभाळ करणार असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर तिला गोव्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. पीडित मुलीनं बाळाला जन्म दिला असून हे बाळ आता  एक वर्षांचं झालं आहे. गोवा पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Rape

    पुढील बातम्या