मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

National खो-खो खेळाडू Rape : हत्येपूर्वीच्या त्या तीन शब्दांची क्लीप पोलिसांना सापडली

National खो-खो खेळाडू Rape : हत्येपूर्वीच्या त्या तीन शब्दांची क्लीप पोलिसांना सापडली

पोलिसांना आतापर्यंत अनेक धागेदोरे मिळाले आहेत. पोलिसांना या घटनेदरम्यानच या तरुणीनं केलेल्या फोनकॉलची ऑडिओ क्लिपही सापडली आहे. यामध्ये तीनं 'तीन शब्द' वापरले आहेत. पोलीस आता या शब्दांवरून कसून तपास करत आहेत.

पोलिसांना आतापर्यंत अनेक धागेदोरे मिळाले आहेत. पोलिसांना या घटनेदरम्यानच या तरुणीनं केलेल्या फोनकॉलची ऑडिओ क्लिपही सापडली आहे. यामध्ये तीनं 'तीन शब्द' वापरले आहेत. पोलीस आता या शब्दांवरून कसून तपास करत आहेत.

पोलिसांना आतापर्यंत अनेक धागेदोरे मिळाले आहेत. पोलिसांना या घटनेदरम्यानच या तरुणीनं केलेल्या फोनकॉलची ऑडिओ क्लिपही सापडली आहे. यामध्ये तीनं 'तीन शब्द' वापरले आहेत. पोलीस आता या शब्दांवरून कसून तपास करत आहेत.

  • Published by:  News18 Desk

बिजनौर, 14 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्काराची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमध्ये एका राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडूवर बलात्काराची (Rape case) घटना घडली होती. बिजनौर रेल्वे स्थानकावजळ रेल्वे ट्रॅकवर तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांना आतापर्यंत अनेक धागेदोरे मिळाले आहेत. पोलिसांना या घटनेदरम्यानच या तरुणीनं केलेल्या फोनकॉलची ऑडिओ क्लिपही सापडली आहे. यामध्ये तीनं 'तीन शब्द' वापरले आहेत. पोलीस आता या शब्दांवरून कसून तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडूच्या हत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी शासकीय आदेशानुसार, हत्येचा तपास रेल्वे पोलिसांकडून नागरी पोलिसांना देण्यात आला आहे. यानंतर, एसपी बिजनोर डॉ.धर्मवीर सिंह यांनी या खुनाच्या खुलाशासाठी एसपी सिटी डॉ.प्रवीण रंजन यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत. यासोबतच, एसओजी आणि स्वाट टीमही तैनात करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून जेवणाचा डबाही सापडला

घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक जेवणाचा डबाही सापडला होता. यात दीड पोळी आणि भाजी होती. पोलिसांनी हा डबाही ताब्यात घेतला आहे. यावरील बोटांचे ठसे घेऊन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनेनंतर हरवलेल्या मोबाईलचं लोकेशनही ट्रेस केलं आहे. घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील आदमपूर गावापर्यंत गेल्यानंतर हा मोबाईल बंद करण्यात आला आहे.

एकाला घेतलंय ताब्यात

मोबाईल बंद असलेल्या ठिकाणाजवळ पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या कंबरेवर काही नखांचे ओरखडेही आढळले आहेत. ही व्यक्ती रेल्वे स्थानकावर खतांची, सिमेंटची पोती आणि इतर माल मालगाडीवर चढवण्या-उतरवण्याची कामं करतो. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत. लवकरच या घटनेचा उलगडा केला जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. घटनेचं गांभीर्य पाहता शासनानं मुरादाबादचे डीआयजी शालभ माथूर यांना जिल्ह्यातच तळ ठोकण्याचे आदेश दिले आहेत.

हे आहेत तरुणीच्या तोंडचे तीन शब्द

डीआयजी शालभ माथूर यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी केली आणि माहिती घेतली आहे. तसंच, तरुणीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. तिच्या ओळखीच्या एका तरुणाकडून एक मोबाईल रेकॉर्डिंग मिळालं आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारेही पोलीस तपास करत आहेत. रेकॉर्डिंगमध्ये सुरुवातीला तरुणी जोराने किंचाळत सोडून देण्याविषयी बोलत आहे. परंतु, स्पष्ट आवाज नसल्यामुळं ती सौरभ म्हणत आहे की सुअर (डुक्कर) म्हणत आहे, हे स्पष्ट समजत नाही. एका ठिकाणी मुलीनं 'अंकल' असा शब्दही वापरलाय. तपासात हे तीन शब्द समाविष्ट करून पोलीस या मुद्द्यांचाही तपास करत आहेत.

हे वाचा - मुलीच्या मैत्रिणीवर जडलं बापाचं प्रेम; आईला धोका दिल्यानं भडकलेल्या तरुणीनं उचललं मोठं पाऊल

डीआयजी शालभ माथूर यांनी या घटनेचे आतापर्यंत बरेच धागेदोरे मिळाल्याचं म्हटलंय. घटनेचा लवकरच उलगडा होईल. पोलीस घटना उघड करण्याच्या जवळ पोहोचले आहेत आणि या प्रकरणात गुंतलेली सर्व पथके कसून काम करत आहेत. लवकरच आम्ही प्रकटीकरणाच्या जवळ येऊ, असंही ते म्हणाले आहेत.

First published:

Tags: Rape case, Rape news