• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नोकराला तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडले आक्षेपार्ह फोटो, 1 लाख रुपये मागत केलं ब्लॅकमेल

नोकराला तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडले आक्षेपार्ह फोटो, 1 लाख रुपये मागत केलं ब्लॅकमेल

घराची साफसफाई (Cleaning of house) करताना सापडलेल्या जुन्या मोबाईलमधील (Old Mobile) आक्षेपार्ह फोटो (Photos) वापरून मालकाला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 14 सप्टेंबर : घराची साफसफाई (Cleaning of house) करताना सापडलेल्या जुन्या मोबाईलमधील (Old Mobile) आक्षेपार्ह फोटो (Photos) वापरून मालकाला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याची घटना नुकतीच समोर आली आहे. घरात साफसफाईसाठी येणाऱ्या नोकराला खराब झाल्यामुळे अडगळीत फेकून दिलेला एक मोबाईल सापडला. तो मोबाईल त्याने दुरुस्त करून घेतला आणि त्यात त्याला घऱमालक तरुणी आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे आक्षेपार्ह अवस्थेतील काही फोटो सापडले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. शाहरुख खानने केले ब्लॅकमेल भोपाळमधील एका तरुणाच्या घरी शाहरूख खान नावाचा नोकर साफसफाईसाठी येत होता. एक दिवस त्याला खराब झालेला मोबाईल सापडला. तो दुरुस्त केल्यावर त्यातील फोटोंचा वापर करून त्याने तरुणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा डाव आखला. एका व्हॉट्सअप अकाउंटवरून त्याने तरुणाला संपर्क साधत ते फोटो पाठवले. हे फोटो व्हायरल न कऱण्याच्या मोबदल्यात त्याने 1 लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने वेगवेगळ्या 5 बनावट फेसबूक अकाऊंटच्या माध्यमातून हे फोटो व्हायरल केले. तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहरूख खानला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल फोन जप्त केला असून काही सिमकार्डदेखील जप्त केले आहेत. तरुणाने वेगवेगळे पाच अकाऊंट तयार करून फोटो व्हायरल केल्याची कबुली दिली आहे. हे वाचा - ‘थप्पड गर्ल’नंतर आता ‘बुक्की बॉय’ची चर्चा, छेड काढणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात मार जुन्या मोबाईलमध्ये आपल्याला तरुणाचे आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो सापडल्यामुळे आपल्याला पैसे कमावण्याची संधी दिसली. स्वतःची आणि स्वतःच्या होणाऱ्या पत्नीची बदनामी टाळण्यासाठी हा तरूण आपल्याला 1 लाख रुपये देईल, अशी आपला अंदाज असल्याचं शाहरूख खाननं पोलिसांना सांगितलं. मात्र आपल्याला पैसे न दिल्यामुळे आपण ते फोटो व्हायरल केल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
  Published by:desk news
  First published: