मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'बिबट्या आला रे...', पुण्यात गहुंजे स्टेडिअम परिसरात ती अफवाच!

'बिबट्या आला रे...', पुण्यात गहुंजे स्टेडिअम परिसरात ती अफवाच!

 मावळ तालुक्यातील गहुंजे तसंच साईनगर भागात एका व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमुळे गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

मावळ तालुक्यातील गहुंजे तसंच साईनगर भागात एका व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमुळे गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

मावळ तालुक्यातील गहुंजे तसंच साईनगर भागात एका व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमुळे गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

आनिस शेख, प्रतिनिधी

मावळ, 4 एप्रिल:  पुण्यातील (Pune) मावळ (Maval) तालुक्यातील गहुंजे (Gahunje) तसेच साईनगर भागात बिबट्याचा वावर असल्याबाबत एक व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट (Fake Whats app post) मोठया प्रमाणात व्हायरल झली आहे. या पोस्टमध्ये साईनार भागातील मावळ गेट हॉटेल ते काकडे वस्तीत बिबटयाचा वावर असल्याचं सांगितलं जात आहे. पण, ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

मावळ तालुक्यातील गहुंजे तसंच साईनगर भागात एका व्हॉट्सअॅप पोस्टमुळे गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. गावात रात्री कोणीही घराबाहेर पडायला तयार नव्हते. रात्रीच काय तर भर दिवसाही एकट्या दुकट्यानं घराबाहेर पडायला नागरिक घाबरु लागलेत. लहान मुलांना तर गावकरी रात्रंदिवस घरातच डांबून ठेवू लागलेत. याला कारण ठरलीये सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक पोस्ट.

अशोक चव्हाणांनी भाजपला चारली धुळ, होमग्राऊंडमध्ये फडकावला महाविकास आघाडीचा झेंडा

गहुजे तसंच साईनगर भागात बिबट्याचा वावर असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. 'साईनगर भागातील मावळ गेट हॉटेल ते काकडे वस्तीत बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी' असं या पोस्टमधून  सांगण्यात आलंय. थेट गहुंजे गावच्या पोलीस पाटलांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल होत असल्यानं अनेकजण यावर विश्वास ठेवत आहेत. कहर म्हणजे, या पोस्टसोबत बिबट्याचा एक व्हिडीओही नेटकऱ्यांकडून व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांत भितीचं वातावरण निर्माण झालंय.

बिबट्याचा हा व्हिडीओ जुना असून नेटकऱ्यांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप तसंच इन्टाग्रामवरही तो अपलोड केला. बिबट्याच्या या अफवेमुळे नागरिक मात्र चांगलेच धास्तावले. या व्हायरल पोस्ट संदर्भात वनविभागाकडून माहिती घेतली असता ही निव्वळ अफवा असल्याचं वनविभागानं स्पष्ट केले. अशी खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्र अधिकारी रेखा वाघमारे यांनी दिली आहे.

चिमुकला कोविड योद्धा, 18 दिवसांच्या बाळाची कोरोनावर मात

नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. केवळ वनविभागाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असं आवाहन वनविभागानं केलं आहे.

First published:

Tags: Video viral