नाशिक, 4 एप्रिल: देशात कोरोनाची (Corona) दुसरी लाट आली आहे. राज्यातही कोरोना प्रचंड वेगाने पसरत आहे. वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांना या कोरोनाने विळखा घातला आहे. उत्तर महाराष्ट्रात कोरोनाने लहान मुलांना (Child Corona) ग्रासलं आहे. मात्र अवघ्या अठरा दिवसांच्या बाळाने कोरोना उपचाराला दिलेला प्रतिसाद सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. घरातील सदस्य कोरोनाबाधित झाल्याने या बाळाला संसर्ग झाला होता. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या बाळाचे प्राण वाचवले आहेत.
बाळ जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्याला अनेक व्याधींनी जखडले होते. श्वसनाचा त्रास, हृदयाचे अनियमित ठोके, किडनीला सूज त्याचबरोबर एचआरटीसी टेस्टचा स्कोर 14 पॉईंटपर्यंत पोहोचला होता. कोरोनासह अनेक व्याधींनी ग्रस्त या चिमुकल्यावर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. गाठीशी असलेला अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ही किमया केली आहे. कोरोनामुक्त झाल्यामुळे हे बाळ आता सर्वात कमी वयाचे कोविडयोद्धा (Corona Recover) ठरले आहे.
राज्यात राबवणार औरंगाबाद पॅटर्न, 2 दिवस असणार कडक लॉकडाऊन?
सध्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मुलं खेळताना किंवा कुठेही बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझेशन आणि सतत हात धुणे, या त्रिसूत्रीचे पालन आवश्यक आहे. घरातील मोठ्यांनी लहान मुलांना या त्रिसूत्रीचा अवलंब करायला शिकवले पाहिजे. त्याचबरोबर मोठ्यांनीही याचे काटेकोरपणे पालन करावे. मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब होणे, अशी लक्षणे दिसत असल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
'लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास आम्ही विरोध करणार', नवनीत राणांचा आक्रमक इशारा
बाळाला वाचवण्यात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञांसह डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर नेहा मुखी, डॉक्टर पूजा चाफळकर, नर्सिंग पथकाचा या उपचारात सहभाग होता. त्यामुळे डॉ. पारख यांच्यासह सर्व टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'फक्त दोन महिन्यांच्या कोविडबाधित बाळावर जगातला पहिला प्लास्मा ट्रान्सप्लांट करण्यात यश आलेले आहे. यावेळी अवघ्या १८ दिवसांच्या बालकावर यशस्वी उपचार झाले. नागरिकांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी सजग राहायला हवे', असं मत 18 दिवसांच्या बाळावर उपचार करणारे डॉक्टर सुशील पारख यांनी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Nashik