मंचर, 28 मे: विवाहित महिलेनं आपल्या प्रियकराच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, म्हणून राग आलेल्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या (Murder Case) केली आहे. हत्येनंतर आरोपींनी संबंधित महिलेचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावाच्या हद्दीत टाकून दिला होता. स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दोन्ही आरोपींना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. संबंधित अटक केलेल्या आरोपींची नावं सुनील बबन भुंताबरे आणि शिवनाथ गावबा मध्ये असं असून दोघंही जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील रहिवासी आहेत. तर संबंधित मृत महिला रांजणी याठिकाणी बाजरी पिकाचं राखण करण्यासाठी आली होती. यावेळी तिची ओळख आरोपी सोबत झाली. यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान आरोपी प्रियकर मृत विवाहित महिलेवर आपल्या मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. पण तिने नकार दिला. मित्रासोबत शारीरिक संबंध ठेण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी प्रियकराने आणि त्याच्या साथीदाराने संबंधित महिलेच्या डोक्यात दगडाने हल्ला चढवत तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावाच्या हद्दीत टाकला आणि घटनास्थळावरून पोबारा केला. त्याच दिवशी गावातील काही नागरिकांना हा मृतदेह पाहिला आणि घटनेची माहिती मंचर पोलिसांना दिली. हे वाचा- बोलण्यास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीवर ब्लेडनं जीवघेणा हल्ला, ठाण्यातील घटना याप्रकरणी मृत महिलेच्या आई नंदाबाई पोपट केदार यांनी आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणात अज्ञातांविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 31 मे पर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







