मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटनेनं मुंबई हादरली!

पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटनेनं मुंबई हादरली!

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Mumbai: पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या (Wife brutal murder) केली आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर: पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या (Wife brutal murder) केली आहे. आरोपीनं पत्नीचा पाठलाग करत तिला, भररस्त्यात अडवलं, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने बोलण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं पीडितेवर धारदार चाकूने सपासप वार (Stabbed with knife) केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यामध्ये 21 वर्षीय पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यातच तिचा  दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (FIR lodged) आला असून आरोपी पतीला अटक (Accused husband arrested) करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आकांक्षा अक्षय आठवले असं हत्या झालेल्या 21 वर्षीय महिलेचं नाव आहे. संबंधित घटना मुंबईतील चेंबूर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत आकांक्षा हिच 2019 साली आरोपी अक्षयसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, अक्षयचा आलकांक्षा सोबत सतत वाद होऊ लागला. याच रागातून आकांक्षा गेल्या काही महिन्यांपासून पतीपासून वेगळं आपल्या घरी राहु लागली. दरम्यानच्या काळात अक्षयने तिच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-अर्ध्यावरच मोडला संसार; पत्नी माहेरी गेल्याच्या विरहातून तरुणाचं टोकाचं पाऊल

पण आकांक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने आपल्या कामावर जात होती. यावेळी आरोपी अक्षय या रिक्षाचा पाठलाग करत होता. रिक्षा राहुलनगर परिसरात आल्यानंतर आरोपीनं रिक्षाला अडवलं आणि पत्नी आकांक्षाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही आकांक्षाने पती अक्षयशी बोलण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अक्षयने आपल्याजवळी धारदार चाकुने आकांक्षावर सपासप वार केले.

हेही वाचा-छेडछाडीला विरोध करणाऱ्या पैलवान तरुणीची कोचकडून हत्या, भावालाही घातल्या गोळ्या

हा हल्ला इतका भयंकर होती की, या घटनेच आकांक्षा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत काही स्थानिकांनी तिला त्वरित सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी उपचारपूर्वीच आकांक्षाला मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai, Murder