• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सांगली: Social Media वरील मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 7 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

सांगली: Social Media वरील मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 7 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

Crime in Sangli: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor girl rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी पीडितेवर अत्याचार करत होता.

  • Share this:
    सांगली, 12 नोव्हेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor girl rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social media friendship) अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love trap) ओढून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर (Minor girl pregnant), ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत. जयदीप जयपाल चौधरी असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मध्ये पीडित मुलीची सोशल मीडियावर  जयदीप चौधरी नावाच्या मुलाशी ओळख झाली होती. कालांतराने दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर ते सातत्याने चॅटींगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी आरोपी जयदीप याने पीडितेकडं भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हेही वाचा- तासाभराच्या अंतराने प्रेमीयुगुलानं सोडला प्राण; जळगावातील लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट दरम्यान, पीडित मुलगी एका कार्यक्रमानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे इस्लामपूर याठिकाणी आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यातही ती आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास आली होती. यावेळी आरोपीनं पीडित मुलीला इस्लामपूर बस स्थानक परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. यानंतर आरोपी पीडितेला बहे बेटावर फिरायला घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर अत्याचार केला. हेही वाचा-पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटनेनं मुंबई हादरली! यानंतर, आरोपीनं वेळोवेळी लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अत्याचार केले आहेत. दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी अचानक पीडित मुलीच्या पोटात दुखू लागलं. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी तपासणी केली असता, संबंधित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती निघाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईनं आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: