Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पिंपरी: किरकोळ कारणातून तरुण बनले राक्षस; खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला दिला भयंकर मृत्यू

पिंपरी: किरकोळ कारणातून तरुण बनले राक्षस; खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला दिला भयंकर मृत्यू

Murder in Pimpri: खरेदी करण्यासाठी चौकात गेलेल्या एका व्यक्तीला टोळक्यानं लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Man beaten by group) केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पिंपरी, 16 नोव्हेंबर: खरेदी करण्यासाठी चौकात गेलेल्या एका व्यक्तीला टोळक्यानं लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Man beaten by group) केल्याची घटना समोर आली आहे. या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा सोमवारी सायंकाळी मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलीनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पिंपरी परिसरातील रहिवासी असणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा  तपास केला जात आहे.

मल्लिकार्जुन उर्फ मल्लू अवधूत पतडे असं हत्या झालेल्या 49 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते पुण्यातील ताथवडे गावातील रहिवासी आहेत. तर ऋषीकेएश चपाले, महेश पवार आणि पवन सिंग असं गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपींची नावं आहे. संबंधित सर्व आरोपी पिंपरी परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास केला जात आहे.

हेही वाचा-दिवसभर एकत्र फिरले अन् रात्री घडलं भलतंच; मित्राच्या हातूनच तरुणाचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मल्लिकार्जुन पतडे हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ताथवडे चौकात खरेदीसाठी गेले होते. यावेळी चौकातील काही तरुणांसोबत पतडे यांचा किरकोळ वाद झाला. किरकोळ वादातून शिवीगाळ केल्याच्या कारणातून संबंधित आरोपींनी पतडे यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी पोटात आणि छातीत मारहाण केली आहे. या मारहाणीत पतडे घटनास्थळीच जखमी अवस्थेत पडले.

हेही वाचा-हनी ट्रॅपला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन? चिठ्ठीत लिहिलेला पासवर्ड उलगडणार गूढ

यानंतर आसपासच्या काही लोकांनी पतडे यांना तातडीनं जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी पतडे यांचा मृत्यू झाला आहे. पतडे यांचा मृत्यू झाल्यानंतर पतडे यांची मुलगी लक्ष्मी मल्लिकार्जुन पतडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Pimpri chinchavad