मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात 'मजनू भाई'चा धुमाकूळ; चौघींसोबत थाटला संसार, 53 तरुणींसोबत लग्नाची बोलणी

पुण्यात 'मजनू भाई'चा धुमाकूळ; चौघींसोबत थाटला संसार, 53 तरुणींसोबत लग्नाची बोलणी

Crime in Pune: पुण्यातील विविध भागात राहणाऱ्या तब्बल 57 तरुणींना फसवणाऱ्या (Fraud) एका सराईत तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक (Accused arrest) केली आहे.

Crime in Pune: पुण्यातील विविध भागात राहणाऱ्या तब्बल 57 तरुणींना फसवणाऱ्या (Fraud) एका सराईत तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक (Accused arrest) केली आहे.

Crime in Pune: पुण्यातील विविध भागात राहणाऱ्या तब्बल 57 तरुणींना फसवणाऱ्या (Fraud) एका सराईत तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक (Accused arrest) केली आहे.

पुणे, 06 जुलै: पुण्यातील विविध भागात राहणाऱ्या तब्बल 57 तरुणींना फसवणाऱ्या (Fraud) एका सराईत तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक (Accused arrest) केली आहे. आरोपीनं विविध सोशल मीडिया अ‍ॅप आणि प्रत्यक्ष ओळख करून तब्बल 57 तरुणींना गंडा घातला आहे. यातील चार तरुणींसोबत आरोपीनं बनावट लग्न (Fake Marriage) केल्याचं देखील समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर तो, अन्य 53 तरुणींसोबत लग्नाची बोलणी देखील करत होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. फसवणूक झाल्यानंतर एका तरुणीनं पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुणाचं बिंग फुटलं आहे.

योगेश दत्तू गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी पुण्यातील विविध भागांत फिरायचा. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून तिचा विश्वास संपादन करून तिचा मोबाईल घ्यायचा. याशिवाय सोशल मीडिया, विविध अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचं आमिष दाखवायचा. यानंतर मुलींच्या कुटुंबातील मुलाला लष्करात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून त्यांना 2 ते 3 लाख रुपयांना गंडा घालायचा. त्याचा हा धंदा मागील बऱ्याच वर्षांपासून सुरू होता.

हेही वाचा-सात फेऱ्याआधीच नवरदेवानं केली विचित्र मागणी; मंडपातून रिकाम्या हाती परतली वरात

सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी 2020 रोजी त्याची ओळख आळंदी देवाची येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीशी झाला. संबंधित तरुणीला आरोपी योगेशचं आधारकार्ड सापडलं होतं. तरुणीनं योगेशला आवाज देत त्याचं आधारकार्ड परत दिलं. यातूनचं त्यांची ओळख झाली. यानंतर त्यानं लष्करात असल्याचं खोटं ओळखपत्र दाखवून फिर्यादीचा आणि तिच्या आईचा विश्वास संपादन केला. एकेदिवशी आरोपीनं फिर्यादी तरुणीशी खोटं लग्न करून तरुणीच्या भावाला लष्करात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 2 लाख रुपये घेतले.

हेही वाचा-लग्नापूर्वी नवरी पळाली म्हणून दुसरीसोबत जुळवलं मात्र ती सुद्धा फरार

यानंतर आरोपी योगेश फरार झाला. पीडितेला तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने बिबवेवाडी पोलीसांत तक्रार दाखल केली. बराच दिवस तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. आरोपीनं अशाच प्रकारे पुण्यातील एकूण 57 तरुणींना फसवलं असल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. यातील चार तरुणींसोबत आरोपीनं संसार थाटल्याचंही समोर आलं आहे. तर 53 तरुणींसोबत त्याची लग्नाची बोलणी सुरू असल्याचंही स्पष्ट झालं आहे. आरोपीनं संबंधित 53 तरुणींना प्रत्येकी 1 लाख रुपयांना गंडा घातला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Marriage, Pune