मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहिली नवरी पळाली अन् लग्नाच्या दिवशी दुसरीही फरार; मग नवरदेवाने उचललं असं पाऊल

पहिली नवरी पळाली अन् लग्नाच्या दिवशी दुसरीही फरार; मग नवरदेवाने उचललं असं पाऊल

Jalgaon Groom cheated by broker: लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने नवरदेवाकडून पैसे घेतले मात्र, लग्नासाठी ज्या मुली पाहिल्या होत्या त्याच बेपत्ता झाल्या.

जळगाव, 6 जुलै : लग्नासाठी नवरदेवांना मुली शोधून देण्याच्या नावाखाली पैसे घेत त्यांची फसवणूक केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढता दिसत आहेत. आता असाच एक प्रकार जळगावात (Jalgaon) घडल्याचं समोर आलं आहे. लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत नवरदेवाची दीड लाख रुपयांना फसवणूक (man cheated with groom) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल (Groom file police complaint) करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रवींद्र नावाच्या तरुणाचे लग्न ठरवण्यासाठी मुलीचा शोध सुरू होता. रवींद्रचे लग्न जुळवून देण्यासाटी राजेश्वर पाटील नावाच्या व्यक्तीने लग्न जुळवून देण्याचं सांगत त्याच्याकडून पैसे मागितले. त्यानुसार रवींद्र याने राजेश्वर याला 30 हजार रुपये सुद्धा दिले. मात्र ज्या मुलीचे स्थळ सुचविले ती पळून गेल्याचे सांगत अन्य मुलीचा शोध घेण्याचे ठरले.

अजब खुन्नस! घराकडे पाहून केली शिवीगाळ; जाब विचारल्यानं कुटुंबाला चाकू अन् बेल्टनं मारहाण

त्यानंतर पंढरपूर येथील एक मुलगी निश्चित करुन मुलीला दागिने घेण्यासाठी म्हणून एक लाख 10 हजार रुपये उकळले. लग्नासाठी 22 जून ही तारीख ठरली. पण नवरी मुलगी आलीच नाही. यावेळी आपली फसवणूस झाल्याचं रवींद्र याच्या लक्षात आले. त्यानंतर रवींद्र याने तात्काळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

रवींद्र याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राजेश्वर पाटील या दलालाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात राजेश्वर याचा सहभाग आहे का तसेच मुलांची फसवणूक करणारी ही एक टोळी आहे का या दृष्टीने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अशाच प्रकारे लग्न लावून देण्याच्या नावाखाली मुलांकडून पैसे घेत दलालांनी पोबारा केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

First published:

Tags: Crime, Jalgaon