Home /News /pune /

Pune: लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता आरोपी, पहाट होताच केलं असं काही...

Pune: लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता आरोपी, पहाट होताच केलं असं काही...

Man killed wife in Dehu: देहू येथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    अनिस शेख, प्रतिनिधी देहू, 29 मे: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या (murder of wife) केल्याची घटना देहू (Dehu, Pune) येथे घडली आहे. श्री क्षेत्र देहू येथील वडाचा मळा (Vadacha Mala, Dehu) येथे राहणाऱ्या वैभव लांबकाणे या तरुणाने घरा जवळच राहणाऱ्या पूजा पाटील हिच्यासोबत मागील तीन महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला होता. वैभवच्या घरच्यांचा या प्रेम विवाहाला विरोध होता. विवाहानंतर अनेक शुल्लक कारणावरून पती वैभव हा पत्नी पूजाला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला होता. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणे ही होऊ लागली. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पती वैभव तसेच पत्नी पूजा यांच्यात जोरदार भांडण झालं. मध्यरात्री पूजा झोपेत असताना भांडणाचा बदला घेण्यासाठी वैभवने झोपेत असतानाच पूजाचा गळा आवळला. आपला जीव वाचवण्यासाठी तसेच वैभवच्या हातातील गळा सुटावा यासाठी पूजाने अनेक वेळा प्रयत्न केले पंरतू तिचा मृत्यू होईपर्यंत वैभवने तिचा गळा सोडला नाही आणि अखेर पूजाचा मृत्यू झाला. सोलापूर : दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला रात्रभर पूजाच्या मृतदेहा शोजारीच वैभव बसून राहीला. त्यानंतर सकाळ होताच मयत पूजाच्या नातेवाईकांना त्याने सांगितले की, पूजाच्या छातीत दुखत होतं त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांन तात्काळ पूजाच्या घरी दाखल झाले असता बिछाण्यातच तिचा मृतदेह त्यांना आढळून आला. संबधीत घटनेबाबत पूजाच्या नातेवाईकांनी देहूरोड पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता त्यांना संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटला. मग पोलिसांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच कौटुंबिक कलहातून वाद झाल्याने पूजाचा गळा आवळून मारल्याची कबुली त्याने दिली. मावळ तालुक्यातील आठवड्याभरात दुसरी हत्येची घटना आहे. याआधी तळेगाव येथील 22 वर्षीय सुनेने कौटुंबिक वादातून कापडी ब्लाउजने आपल्या सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी विवाहिते सह मयत महिलेच्या मुलाला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Murder, Pune

    पुढील बातम्या