मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूर : दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला

सोलापूर : दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला

वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं प्राणघातक हल्ला केला.

वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं प्राणघातक हल्ला केला.

वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं प्राणघातक हल्ला केला.

सोलापूर, 28 मे : पंढरपूरच्या वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर असलेल्या पारधी वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक (Mob Attack on Police) हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाकडून हल्ला करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर पारधी समाजाची वस्ती आहे. तिथं अवैध हातभट्टी दारुचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ही हातभट्टी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आज संध्याकाळी पारधी वस्तीत कारवाई करण्यासाठी छापा सत्र राबवले. तिथे त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, परिसरातील लोकांनी गदारोळ घालत सरकारी कामात अडथळा आणला.

हे वाचा - धक्कायदायक जिवाशी खेळ! डॉक्टर बायको आजारी पडली, तर नवराच झाला रुग्णांसाठी डॉक्टर

पारधी वस्तीमध्ये 20 ते 25 महिला आणि पुरुषांनी मिळून थेट पोलिसांवरच हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी जमावाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या जमावावर ताबा मिळवणं पोलिसांच्या कठीण गेलं. या गदारोळात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

अद्याप कुणालाही अटक नाही

दरम्यान, या सर्व गदारोळानंतर आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस लवकरच या विरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षकच गंभीर जखमी असल्याने हे प्रकरण आता जास्त संवेदनशील बनलं आहे. याप्रकरणी जमावाविरोधात शनिवारी (28 मे) मोठी कारवाई होण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime news, Solapur