रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 15 फेब्रुवारी : पुणे-नाशिक महामार्गावर एक मोठा रस्ता अपघात झाला होता. या एका व्हॅनने तब्बल 17 महिलांना चिरडले होते. तसेच या भीषण अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघाताच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तसेच हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. पुणे नाशिक महामार्गावर लग्नाच्या स्वयंपाकासाठी आलेल्या 17 महिलांच्या थरारक अपघातात महिलांना महामार्गावर चिरडल्याचा प्रकार घडला. यामध्ये 5 महिलांचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. पुणे-नाशिक महामार्गावर शिरोलीतील खरपुडी फाट्यावर महिलांना चिरडुन झालेल्या अपघाताचा थरार cctv कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातात एक कार या महिलांना चिरडुन महामार्गाच्या डिव्हाडरवरुन निघून गेली होती. यानंतर या कारचा राजगुरुनगर पोलीसांकडुन शोध सुरू होता. अखेर कारसह कार चालकाला राजगुरुनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे नाशिक महामार्गावर 17 महिलांना चिरडले, 5 महिलांचा मृत्यू अपघाताचा व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/44T4wsb3mq
— News18Lokmat (@News18lokmat) February 15, 2023
हेही वाचा - 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिऊन दाखव, मित्रांनी दिलं आव्हान आणि घडलं भयानक हॉर्न वाजवल्याने शिवीगाळ करत बोचकरलं - पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 25 वर्षे तरुणीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 13 फेब्रुवारीच्या रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.