आगरा, 15 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या करुन आपले जीवन संपवल्याच्याही घडना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, मद्यसेवनानेही अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे तुम्ही ऐकले असेल. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ताज नगरी आग्रा येथील एक पैज एका जणाच्या मृत्यूचे कारण बनले. खिशात ठेवलेले 60 हजार घेण्यासाठी मित्रांनी बेताल आणि असमंजस अशी अट ठेवल्याचा आरोप आहे. मित्रांनी जयसिंग नावाच्या तरुणाला दहा मिनिटांत तीन क्वार्टर दारू पिण्याचे आव्हान दिले होते. मित्रांनी त्याला सांगितले होते, जर 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिऊन दाखवली तर तुला दारूचे पैसे द्यावे लागणार नाही. यानंतर मित्रांनी दिलेल्या आव्हानावर जोशात येऊन जयसिंगने 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू प्यायला. मात्र, त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्याला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र, त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पैज लावलेल्या दोन मित्रांना अटक केली असून या मृत्यूप्रकरणी त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. डौकीच्या गुढा गावात राहणारे सुखवीर सिंग यांनी ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सुखवीर सिंगने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ जयसिंग (45) हा 60 हजार रुपये घेऊन घरातून निघून गेला होता. त्याला ई-रिक्षाचा हप्ता जमा करायचा होता. जयसिंगचे घर ताजगंज भागातील धंधुपुरा गावात आहे. दरम्यान, जयसिंग शिल्पग्रामजवळ बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे एका ओळखीच्या व्यक्तीने जयसिंगच्या कुटुंबीयांना सांगितले. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - दारू पिऊन आला तरी बायकोकडे 50 रुपये मागितले, नकार दिल्यावर घडलं भयानक धांधूपुरा येथील रहिवासी भोला आणि केशव यांनी त्याला पैज लावून दारू पाजली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोला आणि केशवला अटक केली. दोघांनी चौकशीदरम्यान सांगितले की, जयसिंगला त्यांनी दहा मिनिटांत तीन क्वार्टर दारू प्यायला सांगितले होते. जयसिंग पैज लावून तीन क्वार्टर दारू प्यायला. त्याची तब्येत खराब होत असल्याचे पाहून यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. तर दोन्ही आरोपींनी खिशात ठेवलेले 60 हजार रुपये काढून घेतले. तसेच आपसात तीस हजार रुपये वाटून घेतले होते, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.