मराठी बातम्या /बातम्या /देश /फक्त आईचं! 5 वर्षांच्या मुलासाठी सोनियाने स्कुटीवरून केला मुंबई ते जमशेदपूर 1800 किमी प्रवास

फक्त आईचं! 5 वर्षांच्या मुलासाठी सोनियाने स्कुटीवरून केला मुंबई ते जमशेदपूर 1800 किमी प्रवास

यापुढे ते वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे मिजगा यांनी सांगितले. झोपडपट्टीतील मुलांना प्राथमिक शिक्षण देणं हा त्यांचा प्रयत्न आहे. मिजगा हे  2010 पासून मालवणीत बालवाडी चालवत आहेत. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी झिल इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. मात्र या शाळेला अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नाही.

यापुढे ते वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे मिजगा यांनी सांगितले. झोपडपट्टीतील मुलांना प्राथमिक शिक्षण देणं हा त्यांचा प्रयत्न आहे. मिजगा हे 2010 पासून मालवणीत बालवाडी चालवत आहेत. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी झिल इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. मात्र या शाळेला अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नाही.

गावी गेल्यावर जेव्हा मुलाला त्यांनी फोटो पाठवले तेव्हा कुठे त्याला खात्री झाली की आपली आई आली म्हणून. पण त्या मुलाला आत्ताच भेटू शकणार नाहीत.

जमशेदपूर 25 जुलै: लॉकडाऊनच्याकाळात (Lockdown) देशभर लोक अडकून पडले होते. त्यांच्या करुण कहाण्यांनी (Lockdown Stories) सगळ्यांनाच हेलावून टाकलं होतं. लोकांचे हे हाल अजुनही सुरुच आहेत. काही ट्रेन्स आणि विमानसेवा सुरु झाली तरी प्रत्येकालाच त्याने आपल्या गावी जाणं शक्य झालेलं नाही. अशा एका आईची कहाणी आता पुढे आली आहे. आपल्या 5 वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी मुंबईत (Mumbai) अडकून पडलेल्या सोनिया दास या महिलेने स्कुटीवरून मुंबई ते झारखंडमधलं जमशेदपूर असा तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र क्वारंटाइन(Quarantine) असल्याने अजुनही त्यांना आपल्या मुलाला भेटता आलेलं नाही.

सोनिया दास या मुंबईत एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये फ्री लान्सर म्हणून काम करतात. अशाच एका कामासाठी त्या फेब्रुवारीत मुंबईत आल्या होत्या. मार्च महिन्यात त्यांचं काम संपणार होतं. त्यामुळे त्या आपल्या 5 वर्षांच्या मुलाला घरीच पतीजवळ ठेऊन आल्या. मात्र लॉकडाऊनमुळे त्या मुंबईतच अडकून पडल्या.

जमशेदपूरसाठी थेट रेल्वे किंवा विमानसेवा नसल्याने जाता येणं शक्य झालं नाही. मुंबईत दोन महिने काढल्यानंतर त्यांच्याकडे घरभाडं देण्याएवढे पैसेही शिल्लक नव्हते. शेवटी त्यांनी पुण्यात एका परिचितांकडे ही दिवस काढले. नंतर त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. कारण आईची भेट नसल्याने त्यांचा मुलगाही आजारी पडला होता.

India-China Standoff: चीनला भारताचा आणखी एक दणका, लष्कराने केली जय्यत तयारी

शेवटी सोनिया यांनी स्कुटी घेऊन गावी जाण्याची तयारी केली. मित्रांनी वर्गणी करून त्यांना 5 हजारांची मदत दिली आणि त्या जमशेटपूरकडे रवाना झाल्या. कुठे पाऊस तर कुठे कडक उन. रात्री कुठल्यातरी पोलीस स्टेशनला आश्रय असं करत त्यांनी हा खडतर प्रवास पूर्ण केला. जमशेदपूरला गेल्यावर त्यांना आता क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

शिकण्यासाठी युवकाची धडपड, गावात रेंज नाही म्हणून रोज चढतो डोंगर

मात्र प्रवासात त्या सतत मुलाच्या संपर्कात होत्या. गावी गेल्यावर जेव्हा मुलाला त्यांनी फोटो पाठवले तेव्हा कुठे त्याला खात्री झाली की आपली आई आली म्हणून मात्र आणखी काही दिवस त्यांना तिथल्या क्वारंटाइन सेंटरमध्येच काढावे लागणार आहेत. त्यानंतरच त्या आपल्या लाडक्या मुलाला भेटू शकणार आहेत.

First published:
top videos