Home /News /maharashtra /

मोठा निर्णय! इयत्ता 1 ली ते 12 वीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी होणार, प्रस्तावास सरकारची मंजुरी

मोठा निर्णय! इयत्ता 1 ली ते 12 वीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी होणार, प्रस्तावास सरकारची मंजुरी

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वीसाठी सुमारे 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता

मुंबई, 25 जुलै: कोरोना व्हायरस अर्थात 'कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वीसाठी सुमारे 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास राज्य सरकारकडूनही मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. CBSE ने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत शिक्षण विभागानेही इयत्ता. 1 ली ते 12 वीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावात आता राज्य शासनाचीही मंजुरी मिळाली आहे.  अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. हेही वाचा...शिकण्यासाठी युवकाची धडपड, गावात रेंज नाही म्हणून रोज चढतो डोंगर सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्यात शैक्षणिक वर्ष 2020-21 हे 15 जूनपासून सुरु झालं आहे. विद्यार्थ्यांची नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारनं ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. शाळा प्रत्यक्षात सुरु न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. @scertmaha @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks pic.twitter.com/XjSdQZKHAQ Online classes साठी केंद्राने जाहीर केले नवे नियम दुसरीकडे, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) दररोजची सगळीच कामे आता बदलून गेली आहेत. प्रत्येकाल आता जास्त काळजी घ्यावी लगात आहे. सगळ्यांना चिंता आहे ती विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाची. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनावर उपाय असल्याने शाळेत पूर्वीसारखं आता जाता येणार नाही. ही परिस्थिती किती दिवस असेल याचाही अंदाज अजुन कुणालाच नाही त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी Online classes सुरू केले आहेत. मुलं तासंतास आता मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. (guidelines for online classes ) त्यामुळे Online classesच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे. कोरोनामुळे बाहेर खेळण्यावर मुलांना बंधणं आली आहेत. त्यात सगळाच अभ्यास ऑनलाईन असल्याने मुलं मोबाईल आणि लॅपटॉप समोर बसून राहत आहे. त्यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांना चिंता वाटत होती. त्यामुळे तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने हे नवे नियम जाहीर केले आहेत. असे आहेत नवे नियम - वाचा -Pre Primary – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे -Class 1 to 12 – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा. -Class 1 to 8 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको -Class 9 to 12 - प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे चार सेशन्स. हेही वाचा...कोरोनावरून राडा! रॅपिड अँटिजेन टेस्टला विरोध, कंटेन्मेंट झोनमध्ये तोडफोड या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. सतत स्क्रिन समोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सतत घरी बसून राहिल्यामुळे त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्यायाम होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवर होऊ शकतो. या सगळ्यांचा विचार करून शाळा-पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून या संकटाच्या काळात पुढे गेलं पाहिजे असं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या