• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • चिमुकलीला वाचवण्यासाठी महाराष्ट्र एकवटला; 77 दिवसांत उभारला 16 कोटींचा निधी

चिमुकलीला वाचवण्यासाठी महाराष्ट्र एकवटला; 77 दिवसांत उभारला 16 कोटींचा निधी

Pimpari Chinchwad News: कोरोनासारख्या संकट काळातही महाराष्ट्रानं माणुसकी जपली आहे. एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी आपापल्या क्षमतेनुसार मदत करत तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी उभा (16 crore fund raised) केला आहे.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 16 जून: कोरोनासारख्या संकट काळातही महाराष्ट्रानं माणुसकी जपली आहे. एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी आपापल्या क्षमतेनुसार मदत करत तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. पिंपरी चिंचवडमधील 10 महिन्यांची वेदिका शिंदे महाराष्ट्राची लेक म्हणून ओळखली जातं आहे. कारण  SMA म्हणजेच Spinal Muscular Atrophy Type- 1 या अतिशय  दुर्धर आजारातून वेदिकाला वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मदतीला धावून आला आहे. वेदीका पाच महिन्यांची असताना तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजारानं ग्रासल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत होता. त्यामुळे उपचार करणं अत्यावश्यक होतं. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा (Zolgensma) ही एकमेव लस उपलब्ध आहे. पण या एका लशीची किंमत तब्बल 22 कोटी आहे. असं असताना वेदिकाच्या आई बाबानं तिला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं आहे. झोलगेन्स्मा इंजेक्शनची किंमत 22 कोटी असल्यानं एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. मग त्यांनी आपल्या लेकीला वाचवण्यासाठी महाराष्ट्राला साद घातली. अडचणीत सापडलेल्या वेदिकाच्या आई -बाबांना राज्यातील दीड लाख नागरिकांनी आर्थिक मदत पाठवली. महाराष्ट्रातील नागरिकांनी अवघ्या 77 दिवसांत तब्बल 16 कोटी रुपयांच्या मदतीचा निधी  उभारला आहे. हे ही वाचा-पतीला तोंडानं ऑक्सिजन देतानाचा फोटो झालेला व्हायरल, आता कशी आहे महिलेची अवस्था? महाराष्ट्रातील जनतेनं केलेल्या मदतीमुळं आज आमच्या लेकीचा पुनर्जन्म झाल्याची वेदिकाची आई स्नेहा आणि  बाबा सौरभ व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं आभार मानलं आहे. वेदिकाला ही महागडी लस देण्यात आली असून तिनं SMA सोबतची लढाई जिंकली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना याचा आनंद झाला आहे.
Published by:sachin Salve
First published: