पुणे 13 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे बंदमुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी या बदलांबद्दल एकदा माहिती घेणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबतत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून टिळक चौकातून लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाह चौका-डावीकडे वळून शिवाजीरोडने उलट मार्गे जिजामात चौक, लाल महल इथे समाप्त होणार आहे. यामुळे या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले जात आहेत Pune Bandh : दुकाने ते खाजगी वाहतूक; पुण्यात उद्या काय चालू अन् काय बंद? पोलिसांकडूनही नियमावली जाहीर हे रस्ते आवश्यकतेनुसार राहणार बंद - लक्ष्मी रोड - सोन्या मारूती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरू झाल्यापासून बेलबाग चौक पास होईपर्यंत) शिवाजी रोड - स.गो. बर्वे चौक ( मोर्चा सेवासदन चौक पास झाल्यानंतर मोर्चा संपेपर्यंत) बाजीराव रोड - पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार) गणेश रोड - फकडे हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार) केळकर रोड - आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा बुधावर चौकातून पास होईपर्यंत) पुण्यात उद्या दिसणार शिवप्रेमींची एकजूट! पाठिंब्यासाठी दुकाने, बाजारपेठा बंद, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही सहभाग पर्यायी मार्ग - मोर्चाच्या कालावधीत वरील मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येत असल्याने वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडचा वापर करून इच्छितस्थळी जावं, असं सांगण्यात आलं आहे.
काय बंद राहणार, काय चालू? पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप उद्याही सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.