जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात उद्या दिसणार शिवप्रेमींची एकजूट! पाठिंब्यासाठी दुकाने, बाजारपेठा बंद, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही सहभाग

पुण्यात उद्या दिसणार शिवप्रेमींची एकजूट! पाठिंब्यासाठी दुकाने, बाजारपेठा बंद, काँग्रेस-राष्ट्रवादीचाही सहभाग

पुण्यात उद्या दिसणार शिवप्रेमींची एकजूट!

पुण्यात उद्या दिसणार शिवप्रेमींची एकजूट!

Pune Bandh : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपालांवर कोणतीही कारवाई न झाल्याने राजकीय पक्षांनी एकमताने पुणे बंदची हाक दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवार दि 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून लाल महाल या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. डेक्कन जिमखाना, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग मार्गे लाल महाल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत. वाचा - मंत्री काय फक्त तुम्हीच झाला का? शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत भाजपच्या नेत्याकडून अनेक वेळा अपमान करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांबाबत विधान केले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर भाजप नेतृत्वाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ही गंभीर बाब असल्याचे सांगत विविध संघटनांनी मंगळवारी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी आणि कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

विविध पक्षाचेही नेते व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार अरविंद शिंदे, दीपक मानकर, संतोष शिंदे, बाळासाहेब धाबेकर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, अंजुम इनामदार, संजय बालगुडे संगीता तिवारी आदींनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व पुणेकरांना जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व पुणे बंद साठी सर्वांनी स्वतःहून पाठिंबा द्यावा आणि मूक मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात