पुणे, 16 एप्रिल: प्रत्येक आठवड्याला कोरोना (Corona) स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेण्यात येत असते त्याप्रमाणे आज बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar), पुणे, पिंपरी-चिंचवडे महापौर, आरोग्य अधिकारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कडक लॉकडाऊन (Strict Lockdown) लावण्याच्या संदर्भात एक इशाराच दिला आहे. पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली.
रिलायन्स समूहाकडून ऑक्सिजनचा पुरवठा
राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही यासबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. रिलायन्स समूहाकडून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला असून रिलायन्सकडून सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.
कडक लॉकडाऊनची वेळ येऊ नये
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. पुणेकर गर्दी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. कडक लॉकडाऊनची वेळ येऊ नये. मात्र, नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर नाईलाजास्तव कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. याआधीच मंत्रिमंडळातील सहकारी मागणी करत आहेत तशाच प्रकारे निर्णय मग घ्यावा लागेल.
वाचा: Prakash Javadekar: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करुन दिली माहिती
आमदारांना मतदारसंघात 1 कोटींच्या खर्चाची मंजुरी
महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या चार कोटींच्या स्थानिक विकास निधीपैकी एक कोटी रुपयांचा खर्च कोरोना रोखण्याच्या संदर्भातील उपाययोजनांसाठी वापरता येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी निधी कमी पडता येणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सर्व मतदारसंघात कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी 350 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
बैठकीनंतर काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांकडून कोरोना स्थितीचा आढावा
पुण्यात ऑक्सिजन बेड वाढवण्याची आवश्यकता
ऑक्सिजन बेड वाढवण्याबाबत चर्चा
मुकेश अंबानींनी ऑक्सिजन देण्याचं आश्वासन
निधीची कमतरता कमी पडू देणार नाही
रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू
राज्यात तातडीच्या कामासाठी 350 कोटी रुपये
आमदारांना 1 कोटींच्या खर्चाची मंजुरी
आमदारांना मतदारसंघात निधी खर्च करता येणार
पुणेकर गर्दी करणार नाहीत अशी अपेक्षा
नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी
कडक लॉकडाऊनची वेळ येऊ नये
ऑक्सिजनबाबत विभागीय आयुक्त बैठक घेत आहेत
3500 रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळाले
डॉक्टरांनी संयमाची भूमिका घ्यावी
जगावर संकट आहे, ससूनच्या डॉक्टरांनी सहकार्य करावं
राजकीय पक्षाचे नेते काय म्हणतात याला महत्व नाही
आरोग्य यंत्रणा, पोलीस गेल्या वर्षभरापासून जीवाचं रान करत आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Coronavirus, Lockdown