जाहिरात
मराठी बातम्या / देश / Prakash Javadekar: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करुन दिली माहिती

Prakash Javadekar: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करुन दिली माहिती

Prakash Javadekar: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करुन दिली माहिती

Prakash Javadekar: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 16 एप्रिल: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Tests covid positive) आला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. आजच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश जावडेकरांचे ट्विट प्रकाश जावडेकर यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्विट करत म्हटलं, “माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी.” यापूर्वीही केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांनी कोरोनावर मात सुद्धा केली.

    जाहिरात

    वाचा :  पुण्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर! ससूनमध्ये एका बेडवर तीन रुग्णांवर उपचार सुरू हरसिमरत कौर बादल यांनाही कोरोना शिरोमणी अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, माझा कोविड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षणे खूपच कमी आहेत आणि मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. योग्य ती काळजी सुद्धा घेत आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला  केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूची ही दुसरी लाट खूपच भयावह असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. कारण, अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. तर कुठे वैद्यकीय ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात