धक्कादायक! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमातच 'सोशल डिस्टन्सिंग'ची ऐसी तैसी

धक्कादायक! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमातच 'सोशल डिस्टन्सिंग'ची ऐसी तैसी

जमावबंदी आणि सोशल डिस्टसिंगचे नियम केवळ केवळ जनतेसाठीच आहे काय?

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 29 मे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी औंध-रावेत उड्डाणपूलाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र, या कार्यक्रमात नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला.

धक्कादायक म्हणजे पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी सोशल डिस्टसिंगचा फज्जाही उडाला. प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंगचं कुठलंही भान यावेळी ठेवलं नाही. मुळात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाने कहर केला आहे. अशा स्थितीत असे कार्यक्रम होत असतील तर कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा.. कोरोनाचा कहर! 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात चौथा लॉकडाऊन सुरु आहे. तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढवण्याची सरकारनं तयारी केली आहे. त्यात उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असेल तर सामान्य नागरिकांचं काय? जमावबंदी आणि सोशल डिस्टसिंगचे नियम केवळ केवळ जनतेसाठीच आहे काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, लॉकडाऊन आणखी वाढवायचा का, बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेले 21 लाख कोटी कोणाला भेटणार, या बाबत अनेक मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितलं. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे.

लाखो मजूर परत गेले आहेत. त्यांची वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी स्किल देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा.. लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का? याबाबत काय म्हणाले अजित पवार

लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही पवार यावेळी म्हणाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलं आहे.

संपूर्ण राज्य 'कोरोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठींबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

First published: May 29, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या