पिंपरी चिंचवड, 29 मे: लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का, बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. औंध रावेत उड्डाणपूलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र सरकारने जाहीर केलेले 21 लाख कोटी कोणाला भेटणार या बाबत अनेक मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितलं. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत, असं सांगत अजित पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे. हेही वाचा.. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं… लाखो मजूर परत गेले आहेत. त्यांची वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी स्किल देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही पवार यावेळी म्हणाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलं आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. हेही वाचा.. पोलिसांमुळे 33 मजूरांचा जीव धोक्यात, तब्बल 20 तास मृतदेहासोबत केला प्रवास राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी 31 मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील, याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







