मुंबई, 06 मार्च : महाविकास आघाडीने आज आपले पहिले अर्थसंकल्प सादर केले. यावेळी अजित पवारांनी शेतकरी आणि स्थानिकांसाठी अनेक योजना आणि निधी सादर केल्या. मात्र यात पुणेकरांसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे मोठी वाहतुक कोंडी होत होती. याला आळा घालण्यासाठी अजित पावांची पुण्यात रिंग रोड उभारण्याची घोषणा केली आहे. यासाठी निधीही जाहीर करण्याता आला आहे. अर्थसंकल्पात अजित पवारांनी नाशिक, औरंगबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबई शहरातून येणार वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी 170 किमी लांबीचा रिंग रोड उभारणार असल्याची घोषणा यावेळी केली. यासाठी सरकराच्या वतीने भूसंपादनासह एकूण 15 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. याचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार उचलणार आहे. यावर्षात या रस्त्यासाठी भूसंपादन केल्यानंत येत्या चार वर्षात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या रिंग रोडचे काम पूर्ण होईल, असे सांगितले. वाचा- Maharashtra Budget : राज्यातील 80% नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार भूसंपादनाचा खर्च राज्याचा, रस्त्याचा खर्च केंद्राचा यावेळी अजित पवारांनी गडकरींचे आभार मानत पुण्यातील रिंग रोडसाठी राज्य आणि केंद्र अर्धा अर्धा खर्च करण्यात असल्याचे सांगितले. रिंग रोडची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्यासाठी खर्च करावी, रस्ते उभारणीचा खर्च केंद्र सरकार करेल, असे गडकरींनी सांगितल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. वाचा- केंद्रावर टीका पण गडकरींचे मानले आभार, अर्थसंकल्पात अजित पवारांची गुगली नितीन गडकरींचे मानले आभार अर्थसंकल्प मांडत असताना अजित पवारांनी, गडकरी यांनी रस्त्यांसाठी नितीन गडकरींनी 1200 कोटी केंद्रीय फंडातून देण्याचं कबूल केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांची भेट झाली यावेळी राज्य सरकारसाठी गडकरींनी मदत केली, त्याबद्दल सभागृहात अजित पवारांनी त्यांचे आभार मानले. गडकरींनी, आठ पदरी- चार पदरी रस्त्यासाठी राज्य सरकारला केलेली ही मदत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.