पिंपरी, 26 जून: सोशल मीडियावर (Social media) घातक शस्त्रांचं (Sharp Weapon) प्रदर्शन केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. गुंडा विरोधी पथकानं तरुणाची उचलबांगडी करत त्याला ढसाढसा रडवलं आहे. 'पुन्हा अशी चूक करणार नाही' अशी माफी मागितल्यानंतर पोलिसांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. सोशल मीडियात घातक शस्त्रांचं प्रदर्शन करून सामाजिक शांतता भंग करण्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड (वय-23) असं या सोशल मीडिया डॉनचं नाव असून तो हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी गायकवाडनं सोशल मीडियावर हवा करण्यासाठी हातात कोयता घेतलेला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोसोबत त्यानं दशहत पसरवणारा मजकुर देखील पोस्ट केला. काही दिवसांनंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सायबर विभाग आणि गुंडा विरोधी पथकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे या तरुणाची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली आहे.
हेही वाचा-तुरुंगात बसून रचला कट अन् बहिणीच्या नवऱ्याचा केला गेम, यवतमाळमधील फिल्मी घटना
या फोटोबाबत माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी आपल्या पोलीस पथकासह जाऊन आरोपी गायकवाडला निगडीतील अंकुश चौकातून ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी गायकवाडला चौकशी करण्यासाठी गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयात आणण्यात आले.
हेही वाचा-पैशापुढं मैत्री हरली; मुंबईत युवकांनी लोखंडी रॉडनं वार करत मित्राचं डोकं ठेचलं
या ठिकाणी आल्यानंतर सोशल मीडिया डॉननं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण त्याची सोशल मीडियावरील दहशत फार काळ टिकली नाही. पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं पोलिसांपुढे शरणागती पत्करली. तसेच पुन्हा अशी चूक करणार नाही, असे सांगून त्यानं ढसाढसा रडायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी गायकवाड याचे हात जोडलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करूत दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.