Home /News /maharashtra /

तुरुंगात बसून रचला कट अन् बहिणीच्या नवऱ्याचा केला गेम, यवतमाळमधील फिल्मी घटना

तुरुंगात बसून रचला कट अन् बहिणीच्या नवऱ्याचा केला गेम, यवतमाळमधील फिल्मी घटना

Crime in Yavatmal: कुख्यात गुंड अक्षय राठोडनं औरंगाबाद येथील तुरुंगात बसून आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा हत्येचा कट रचला होता. त्यानं फिल्मी स्टाईलनं आपल्या दाजीची हत्या घडवून आणली आहे.

    यवतमाळ, 25 जून: बुधवारी (23 जून) रात्री नऊच्या सुमारास कुख्यात गुंड करण परोपटे याची चार ते पाच तरुणांनी बेछूट गोळीबार करत हत्या केली होती. याप्रकरणी मृत करणच्या बायकोनं आपल्या भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अक्षय राठोडसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. मुख्य सूत्रधार आरोपी अक्षय राठोड यानंच आपल्या बहिणीच्या पतीच्या हत्येचा कट तुरुंगात बसून रचल्याची माहिती समोर आली आहे. मृत करण हा आरोपी राठोडच्या टोळीसाठी काम करत होता. पण काही दिवसांपूर्वी वाळूच्या कारणावरून दोघांत वाद झाला. या वादातून त्यानं करणची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. मृत करण परोपटेच्या पत्नीच्या तक्रारीवरून, मुख्य सूत्रधार अक्षय राठोड, आशिष उर्फ बगिरा दांडेकर, प्रवीण केराम, दिनेश तुरकाने, नितेश मडावी, शुभम बघेल, धीरज उर्फ बँड, दिलीप ठक्कर आणि अर्जुन भांजा आदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाभुळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथील रहिवासी असणारा मृत करण परोपटे हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. बुधवारी सायंकाळी करण यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात आला होता. दरम्यान तो एका हॉटेलसमोर उभा असताना रात्री 9 च्या सुमारास चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन करणवर बेछूट गोळीबार केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की करण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. या गोळीबारमध्ये काही गोळ्या हॉटेल चालक गुप्ता यांनाही लागल्या तेही गंभीर जखमी झाले. हेही वाचा-आईनंच चाकूनं वार करून केली 5 वर्षीय मुलीची हत्या; सांगितलं धक्कादायक कारण या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यात उपचारादरम्यान करण परोपटे याचा मृत्यू झाला. तर हॉटेल चालक गुप्ता यांच्यावर उपचार सुरू आहेत. करण परोपटे याच्या हत्येचा कट कुख्यात गुंड अक्षय राठोड यानं औरंगाबादमधील तुरुंगात बसून बनवला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. राठोड हा सध्या एमपीडीए अंतर्गत कारागृहात शिक्षा भोगत आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder Mystery, Yavatmal

    पुढील बातम्या