Home /News /mumbai /

पैशापुढं मैत्री हरली; मुंबईत युवकांनी लोखंडी रॉडनं वार करत मित्राचं डोकं ठेचलं

पैशापुढं मैत्री हरली; मुंबईत युवकांनी लोखंडी रॉडनं वार करत मित्राचं डोकं ठेचलं

जुहूगावात (Juhu) गुरुवारी एका तरुणाची लोखंडी रॉडनं (Iron rod) डोकं ठेचून निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येचं गूढ (Murder mistory) उलगडलं आहे.

    मुंबई, 26 जून: जुहूगावात  (Juhu) गुरुवारी एका तरुणाची लोखंडी रॉडनं (Iron rod) डोकं ठेचून निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही तासांत हत्येचं गूढ (Murder mistory) उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक (3 arrest) केली आहे. पैशाच्या वादातून तीन मित्रांनी आपल्या एका मित्राची निर्घृण हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विजय राठोड, सुरज मांढरे आणि तोहीद खान अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. हे तिन्ही आरोपी जुहू गावातच राहतात. जुहू गावातील काळूबाई निवास चाळीत गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास जेकब खिस्तोफा वै नावाचा तरुण जखमी अवस्थेत आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी जेकबला मृत घोषित केलं. जेकबच्या डोक्यात मागील बाजूनं भयंकर प्रहार करण्यात आला होता. त्यामुळे त्याचा मेंदू बाहेर पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासांत मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आसपास शेजाऱ्यांशी चौकशी केली असता, जेकब हा अमली पदार्थाचा व्यसनी असून गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं समोर आलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारपर्यंत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून संबंधित आरोपीही अमली पदार्थाचे व्यसनी असल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा-युवकानं भररस्त्यात नागरिकांवर केला चाकू हल्ला; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO काही दिवसांपूर्वी जेकब आणि या तीन मित्रांच्या पैशातून वाद झाला होता. या वादातूनच तिघांनी जेकबची हत्या केली आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपींनी जेकबची हत्या केली आणि घराला बाहेरून कडी लावून निघून गेले. यानंतर ते रात्री अकरा वाजता परत घरी आले आणि  जेकबची हत्या झाल्याचा कांगावा करत आरडाओरडा केला. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीपासून या तिंघावर संशय होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Murder

    पुढील बातम्या