जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune: नोकरीचं आमिष दाखवत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला लुबाडलं; आयुष्यभराच्या बचतीवर मारला डल्ला

Pune: नोकरीचं आमिष दाखवत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला लुबाडलं; आयुष्यभराच्या बचतीवर मारला डल्ला

Pune: नोकरीचं आमिष दाखवत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला लुबाडलं; आयुष्यभराच्या बचतीवर मारला डल्ला

Crime in Pune: पुण्यातील एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या (Retired army officer) आयुष्यभराच्या बचतीवर दोन जणांनी डल्ला (Money Fraud) मारल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 13 जुलै: पुण्यातील एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या (Retired army officer) आयुष्यभराच्या बचतीवर दोन जणांनी डल्ला (Money Fraud) मारल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील दोघांनी टाटा कंपनीत (Tata Company) सुपरवायझर पदाची नोकरी (Supervisor Job) देण्याच्या बहाण्यानं सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला फसवलं आहे. आरोपींनी वेळोवेळी विविध कारणं देत, फिर्यादी सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल 12 लाख 59 हजार रुपये लुबाडले आहेत. शिवाय नोकरीही लावून दिली नाही. आपली फसणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. लक्ष्मण गवस असं फसवणूक झालेल्या 51 वर्षीय सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचं नाव असून ते धायरी परिसरातील गणेशनगर येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लष्करी सेवेतून निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानं त्यांनी एखाद्या खाजगी कंपनीत नोकरी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज केला होता. यानंतर संबंधित आरोपींनी फिर्यादी गवस यांच्याशी जानेवारी 2020 मध्ये संपर्क साधला आणि ओळख वाढवली. हेही वाचा- 2000 रुपयांच्या रिफंडसाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यानं असा घातला गंडा सामना नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी टाटा कंपनीत सुपरवायझरची नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. नोकरी देण्याच्या बहाण्यानं आरोपींनी वेळोवेळी विविध कारणं देत फिर्यादीकडून रक्कम उकळली. आरोपींनी जानेवारी 2020 ते मे 2020 दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 12 लाख 59 हजार रुपये स्विकारले. एवढे पैसे घेऊनही आरोपींनी नोकरी न दिल्यानं आपली फसवणूक झाल्याचं गवस यांच्या लक्षात आलं. हेही वाचा- सुरक्षा व्यवस्थेला छेद; नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5लाख रुपयांच्या नोटा गायब यानंतर पीडित लक्ष्मण गवस यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात संबंधित दोन आरोपींविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच नागरिकांनी भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात