मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट, जगताप कुटुंबातून आणखी एकाने भरला अर्ज

Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट, जगताप कुटुंबातून आणखी एकाने भरला अर्ज


चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे पण...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे पण...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे पण...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पिंपरी चिंचवड, 06 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मोठी नाट्यमय घडामोड घडली आहे. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीने अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांनी सुद्धा अर्ज भरला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. आज मोरया गोसावीचं दर्शन घेऊन अश्विनी जगताप यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि अर्ज ही भरला आहे. तर दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

(कसबा पोटनिवडणुकीत फिल्मी ड्रामा, मविआचा उमेदवार थेट पोहोचला टिळक वाड्यावर)

शंकर जगताप सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, त्यांच्या ऐवजी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. आज अचानक शंकर जगताप यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले. पण लक्ष्मण जगताप यांचा हा डमी अर्ज असल्याचा खुलासा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

यावेळी प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे.

कसब्यातून रवींद्र धंगेकर Vs हेमंत रासने

कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने लढत पाहण्यास मिळणार आहे. रवींद्र धंगेकर हे आज थेट टिळक वाड्यावर पोहोचले होते. त्यांनी टिळक वाड्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला देखील अभिवादन केलं.

(शिवसेनेच्या आठवणीने शिंदे गटाचे खास मंत्री भावुक, दिली भावनिक साद)

दरम्यान, महाविकास आघाडीतील चिंचवड विधानसभा कोण लढवणार यावर अजून एकमत झाले नाही. ठाकरे गटाचे राहुल कळाटे आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्यामध्ये उमेदवारी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये शुकशुकाट आहे.

First published: