मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Khed Shivapur Toll : खेड शिवापूर टोलचे भूत पुन्हा पुणेकरांच्या मानगुटीवर, स्थानिकांना मोठा फटका

Khed Shivapur Toll : खेड शिवापूर टोलचे भूत पुन्हा पुणेकरांच्या मानगुटीवर, स्थानिकांना मोठा फटका

खेड शिवापूर टोलचा फटका आता स्थानिकांना बसणार आहे. या टोल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता टोल भरल्याशिवाय येजा करता येणार नाही

खेड शिवापूर टोलचा फटका आता स्थानिकांना बसणार आहे. या टोल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता टोल भरल्याशिवाय येजा करता येणार नाही

खेड शिवापूर टोलचा फटका आता स्थानिकांना बसणार आहे. या टोल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता टोल भरल्याशिवाय येजा करता येणार नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 01 फेब्रुवारी : खेड शिवापूर टोलचा फटका आता स्थानिकांना बसणार आहे. या टोल परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता टोल भरल्याशिवाय येजा करता येणार नाही. खेड शिवापूर टोलकडून आजपासून(दि.01) हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांना आता टोल दिल्याशिवाय पर्याय उरला नाही. सर्व स्थानिक वाहनांकडून ही टोलवसुली करण्यात येणार असल्याची माहिती टोलनाका व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान मागच्या दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 ला खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीसह अन्य राजकीय पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कृती समितीच्या आंदोलकांना यश आले होते. कृती समितीच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन संचालक सुहास चिटणीस, पुणे सातारा टोल रोड प्रा. लि. चे खेड शिवापूर येथील व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा करून पुढील मार्ग निघत नाही तोपर्यंत एम एच 12 व एम एच 14 च्या सर्व वाहनांना टोल माफी देण्यात येईल, असे पत्र दिले होते.

हे ही वाचा : 'आई आत हो, अंगावर येईल' अन् बाहेर गुंड फेकत होते बिअरच्या बाटल्या, पुण्यातला भयावह VIDEO

दरम्यान यावर अद्याप तोडगा झाला नाही परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व टोलनाका प्रशासन यांच्याकडून टोलची वसुली करण्यात येणार आहे. दरम्यान कृती समितीने केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना टोल नाक्यावर सवलत देण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराला टोलमुक्तीतून वगळण्यात आले होते व त्यांच्याकडूनही टोल वसूल करण्यात येऊ लागला होता.

टोलनाका हटाव'चा इशारा

एनएचएआय व रिलायन्स इन्फ्रा यांनी आंदोलकांना टोलमाफीसंदर्भात जो काही शब्द दिला होता, तो त्यांनी फिरवला, तर स्थानिकांचा उद्रेक होईल आणि पुढील घटनेला संबंधित प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे माउली दारवटकर यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेला आहे.

हे ही वाचा : पुण्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? कसबा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा

सर्वसाधारणपणे खेड शिवापूर टोलनाक्याच्या- पासून वीस किलोमीटरच्या परिघांमधील १३० गावांतील नागरिकांनी स्थानिक मासिक पास काढून घ्यावेत व टोल प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खेड शिवापूर टोल नाका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले असून, स्थानिक पास ३१० रुपयांना उपलब्ध आहे. पुणे टोल रोड प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी लोकमतशी बोलताना दिली.

First published:

Tags: Khed, Pune, Pune (City/Town/Village), Toll, Toll naka, Toll news, Toll plaza