पुणे, 30 जानेवारी : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. आता आणखी एका टोळीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुर्ववैमन्यसातून येरवड्यात दोन टोळक्यांनी लक्ष्मीनगर भागात राडा घातला. या टोळक्याने तुफान दगडफेक करून बियरच्या बाटल्या घरावर आणि रस्त्यावर फेकल्या. एवढंच नाहीतर हातात तलवारी आणि कोयते नाचवत दहशत निर्माण केली. या टोळक्याने एकाच्या डोक्यात कोयत्याने वार सुद्धा केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर येरवडा परिसरात ही घटना घडली. अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय 19) असं कोयत्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून 4 अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे,बेकायदा हत्यारे बाळगणे,दहशत माजविणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल केले आहे.
अब्दुल्ला आमीरउल्ला खान याचा मोबाईल गहाळ झाल्याने मित्र महेश मिश्रा आणि आयुष यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तक्रार देऊन तिघे दुचाकीवरून घरी येत होते. तेव्हाा गजराज हेल्थ क्लब समोरून जात असताना ओळखीचे अंश पुंडे उर्फ आनशा ,सुरेश कुडे उर्फ ममडया ,नाग्या आणि यश पात्रे उर्फ काळ्या यांनी दुचाकीवरून पाठलाग करू लागले. (पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई, बँकेच्या माजी अध्यक्षासह कुटुंबातील 4 जणांना घेतलं ताब्यात) त्यावेळी खान याची दुचाकी घसरून तिघे खाली पडले. सर्व अल्पवयीन मुले त्याच्याजवळ आले. त्यावेळी आनशा नावाच्या मुलाने या कुत्राला आज सोडायचे नाही,असे बोलून त्याचा हातातील कोयत्याने खान याच्या डोक्यात 2 वेळा वार केले. या हलल्ल्यात खान जखमी झाला. त्यानंतर तीन मुलांनी लाकढी बांबूने दोघांना बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत खान हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. (औरंगाबाद : पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी, इकडे भावाला कॉल करुन तरुणाचं टोकाचं पाऊल) त्यानंतर या टोळक्याने हातात तलवार आणि कोयते घेऊन परिसरात धिंगाणा घातला. खानला मारहाण झाल्याची समजताच दुसऱ्या टोळक्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. घरांवर आणि रस्त्यावर तुफान दगडफेक आणि बिअरच्या बाटल्या फोडल्या. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराच्या दारे ,खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. सहा महिन्यापूर्वी आरोपी आणि फिर्यादी खान याच्यात फुटबॉल खेळण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी खान याला मारहाण केली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून एकाला ताब्यात घेतले आहे. फरार मुलांचा शोध घेत आहे, अशी माहिती येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी दिली.