मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...तर पहिली गोळी झेलायला तयार, विनायक राऊत थेट बोलले, काय आहे कारण?

...तर पहिली गोळी झेलायला तयार, विनायक राऊत थेट बोलले, काय आहे कारण?


'रिफायनरी प्रकल्प राबवताना तेथील लोकांना गोळ्या घालून आणि मुडदे पाडून जबरदस्तीने प्रकल्प करत असाल तर

'रिफायनरी प्रकल्प राबवताना तेथील लोकांना गोळ्या घालून आणि मुडदे पाडून जबरदस्तीने प्रकल्प करत असाल तर

'रिफायनरी प्रकल्प राबवताना तेथील लोकांना गोळ्या घालून आणि मुडदे पाडून जबरदस्तीने प्रकल्प करत असाल तर

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

सचिन जाधव, प्रतिनिधी

रत्नागिरी, 06 फेब्रुवारी : 'लोकांची समजूत काढण्याचे धाडस न करता उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम हे सरकार करत आहेत जर जबरदस्तीने प्रकल्प राबवलात तर विनायक राऊत पहिली गोळी झेलायला तयार आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे.

रत्नागिरीतील हातीस या ठिकाणी पीर बाबर शेख यांच्या उरूसला दर्शनासाठी खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावली. दर्शन घेऊन झाल्यावर विनायक राऊत म्हणाले लोकसभा मतदारसंघातील सर्वांची सेवा करण्याची जी संधी दिली सद्बुद्धी दिली अशी सद्बुद्धी पुढे दे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे अशी मागणी पीर बाबरशेख बाबांकडे केली.

'रिफायनरी प्रकल्प राबवताना तेथील लोकांना गोळ्या घालून आणि मुडदे पाडून जबरदस्तीने प्रकल्प करत असाल तर त्याला आम्ही ठामपणे विरोध करणार पण सरकारचे कर्तव्य आहे जर तुम्ही एखादा मोठा प्रकल्प आणत असाल तर त्या गावातील लोकांशी संवाद साधा प्रकल्प किती चांगला आहे, ते पटवून द्या लोकांची समजूत काढण्याचे धाडस न करता उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम हे करत आहेत जर जबरदस्तीने प्रकल्प राबवलात तर विनायक राऊत पहिली गोळी झेलायला तयार आहे, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

'दीपक केसरकर सारख्या उपटसुभ्याला जास्त किंमत देत नाही. कालचा आलेला उपरा आणि आज आम्हाला शहानपणा शिकवतोय जे काय करायचे ते आमच्या पक्षप्रमुखांना चांगलं समजते' असा सणसणीत टोला राऊत यांनी केसरकरांना लगावला.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या पत्रावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नक्की भूमिका घेतील तसंच ते सहानुभूतीपूर्व विचार नक्की करतील. पुढे अडथळा निर्माण होईल असे वाटत नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

First published:

Tags: रत्नागिरी, शिवसेना