मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'टिळकांवर अन्याय, ब्राह्मण नाराज', हिंदू महासंघ कसबा लढण्याच्या तयारीत, भाजपचं टेन्शन वाढणार?

'टिळकांवर अन्याय, ब्राह्मण नाराज', हिंदू महासंघ कसबा लढण्याच्या तयारीत, भाजपचं टेन्शन वाढणार?

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्यामुळे हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्यामुळे हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्यामुळे हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 4 फेब्रुवारी : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसबा पेठ मधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. कसब्याच्या उमेदवारीवरून हिंदू महासंघाने थेट भाजपलाच सुनावलं आहे.

'जगताप कुटुंबाला न्याय आणि टिळक कुटुंबावर अन्याय करण्यात आला आहे. आधी मेधा कुलकर्णी, नंतर देवेंद्र फडणवीस आणि आता टिळक कुटुंबाला संधी नाकारणं म्हणजे भाजपला काही जातींची फक्त मतं हवी असतात. त्या जाती नको असतात. पक्षाचं काम करणं हे जेव्हा हेटाळणीचं असायचं. लोक चिडवायचे तेव्हा ज्यांनी पक्ष वाढवला त्यांनाच खड्ड्यात ढकललं जात आहे,' असा आरोप हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केला आहे.

'खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा आज पुन्हा प्रयत्न झाला आहे. सर्वच जातींना योग्य प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे, याच भावनेतून हिंदू महासंघ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,' असं आनंद दवे म्हणाले आहेत.

'प्रत्येक जातीला योग्य प्रतिनिधीत्व असलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 31 मतदारसंघ आहेत, यापैकी कोथरूड आणि कसबा या मतदारसंघाचे उमेदवार ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करत होते. आजच्या प्रकरणानंतर टिळक कुटुंबाचं राजकारण आता तरी संपलं आहे. ब्राह्मण समाजाच्या तीव्र भावना हिंदू महासंघापर्यंत पोहोचल्या आहेत. ब्राह्मण समाज नाराज आहे, पक्षाने पुनर्विचार करावा,' अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.

कसबा पोटनिवडणुकीवरून भाजपने नाराजीचा उद्रेक, उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक स्पष्टच बोलले

First published:

Tags: BJP