पुणे, 12 नोव्हेंबर : आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हिने पुन्हा एकदा अक्कलेचे तारे तोडले. देशभरातून कंगनाच्या विधानाचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, कंगना राणावत जे काही बोलली ते चुकीचे होते, पण मोदी सरकारविषयीची (modi government) तिची भावना काही अंशी बरोबरही आहे' असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केलं आहे.
'देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले' असे वाद्गग्रस्त विधान कंगनाने केलं होतं. तिच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली.
घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार, नगरमधील संतापजनक घटना
'कंगना राणावतचं ते विधान चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही पण मोदी सरकारसंबंधीचे विधान काही अंशी बरोबरही आहे', असं पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणार सरकार म्हणायचं. संप चिघळण्याशी आमचा संबंध नाही. एसटी संपावर तोडगा का नाही काढला जात? हे सरकार निर्दयी आहे. एसटी संपकऱ्यांना निलंबित करणं चुकीचेच आहे. या संपाचे क्रेडिट कोणालाही मिळो पण कामगारांना न्याय मिळावा, काही झालं की भाजप, संघाचा हात ही सवयच झाली आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांनी उत्तर दिलं.
'जगात कुठे काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया देशात उमटते. त्रिपुरामध्ये मशीद का पाडली, ते अनधिकृत बांधकाम होत की नाही माहीत नाही. परंतु, तिथल्या घटनेचे मालेगावात पडसाद उमटण्याची कारण नाही. स्वातंत्र्याच्या आधीपासून असे घडत आलं. तिथे पोलिसांनी बळाचा वापर करू नये कारण तसे केले तर महविकास आघाडीची vote bank ला धक्का बसेल, असंही पाटील म्हणाले.
तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कंगनाच्या विधानावरून भाजपवर सडकून टीका केली आहे.
नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक आहेत. त्यांचे राज्य आले, त्यानंतर संघाच्या मुख्यालयात तिरंगा फडकला. कंगनाच्या रुपाने संघाची भूमिका मांडली जातेय. हा लाजीरवाणा प्रकार आहे. पद्मश्री मागे घ्या, अशी मागणी पटोले यांनी केली.
गजब! मातीचे हे डोंगर बदलतात जागा, वैज्ञानिकही पडलेत बुचकाळ्यात
देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केला, हा राष्ट्रद्रोह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी राष्ट्रवादी असो की भाजप दोन्ही नेत्यांवरील आरोपांची चौकशी केली पाहिजे, असंही पटोले म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut