मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार, नगरमधील संतापजनक घटना

घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार, नगरमधील संतापजनक घटना

पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर, 12 नोव्हेंबर : अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार (rape) केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नगर शहरातील तारकपूर परिसरातही घटना घडली आहे. तारकपूरमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेवर तिच्या घरात घुसून एक नराधमाने हे कृत्य केलंय. ही महिला पत्र्याच्या घरात राहत होती.

रात्री अंधाराचा फायदा घेऊन मध्यरात्री आरोपीने घरात घुसला. त्यानंतर त्याने महिलेला मारहाण  केली आणि तिच्यावर अत्याचार केला.  अत्याचार केल्यानंतर आरोप घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल केली.

st bus strike : ...तर नव्या भरतीचा विचार करू, ST प्रशासनाने दिले संकेत

दरम्यान, पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती!

तर दुसरीकडे, बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनाचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यातील महिन्यात 60 पोस्कोचे गुन्हे दाखल झाले आहेत. अंबाजोगाईमधील प्रकार अत्यंत गंभीर असून अल्पवयीन पीडिता बालकल्याण समितीकडे आलेले आहे. तिचा जवाब घेतला आहे. वैद्यकीय तपासणी केली असता 20 आठवड्याची गर्भवती आहे.

Indian Army Recruitment 2021: कोरोनामुळे Common Entrance परीक्षा स्थगित

तिच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून गर्भपात केला जाणार आहे. पीडितेवर पाच ते सहा महिन्यांत पैशाचे जेवणाचे आमिष दाखवून 400 ते 500  लोकांनी अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे,  यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे मात्र सुज्ञ नागरिक म्हणून अशा घटना रोखण्यासाठी पुढे यावे असे, आवाहन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ अभय वणवे यांनी केले आहे.

First published:
top videos