मराठी बातम्या /बातम्या /विदेश /गजब! मातीचे हे डोंगर बदलतात जागा, वैज्ञानिकही पडलेत बुचकाळ्यात

गजब! मातीचे हे डोंगर बदलतात जागा, वैज्ञानिकही पडलेत बुचकाळ्यात

मातीचे डोंगर हे एका जागेवरून दुसऱ्या (secret behind moving mountains) जागेवर जातात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

मातीचे डोंगर हे एका जागेवरून दुसऱ्या (secret behind moving mountains) जागेवर जातात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

मातीचे डोंगर हे एका जागेवरून दुसऱ्या (secret behind moving mountains) जागेवर जातात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

मातीचे डोंगर हे एका जागेवरून दुसऱ्या (secret behind moving mountains) जागेवर जातात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. निसर्गात अनेकदा अशा (Unbelivable incidents in nature) घटना घडत असतात, ज्या मानवी कल्पनेच्या कक्षेबाहेर असतात. त्या घटनांमागील वैज्ञानिक कारणं सर्वसामान्यांना माहित नसतात. त्यामुळे या घटनांमागे चमत्कार आहे, असं वाटत राहतं. अशीच एक घटना टांझानियात गेल्या (Moving mountains in Tanzania) अनेक वर्षांपासून घडत आहे. ही घटना म्हणजे इथं असलेले मातीचे डोंगर सतत आपली जागा बदलत असतात.

काय आहे प्रकार?

टांझानिया या अफ्रिकी देशात मातीपासून बनलेले छोटे छोटे डोंगर आहेत. या डोंगराचं वैशिष्ट्य असं की थोड्या थोड्या कालावधीनंतर ते आपली जागा बदलत राहतात. दर वर्षी साधारण 20 मीटर अंतर हे डोंगर पार करतात आणि कुठल्या ना कुठल्या दिशेला सरकतात. या सरकणाऱ्या डोंगरांमागे नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

मातीही सरकते

या डोंगराची माती काहीजणांनी सोबत नेली होती. ही माती घरात ठेवल्यानंतर तीदेखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकत असल्याचा अनुभव काही नागरिकांनी शेअर केला आहे. त्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सरकणे हा त्या मातीचाच गुण असल्याची चर्चा आहे.

हे वाचा- आता Jio चा Laptop ही येणार? काय असतील JioBook चे फीचर्स, पाहा डिटेल्स

ज्वालामुखीपासून तयार झाला डोंगर

हा डोंगर ज्वालामुखीपासून तयार झाला असून त्यामुळे त्याच्या मातीचा रंग वेगळा असल्याचं निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे. 33 फूट उंच आणि 330 फूट रुंद असलेली ही टेकडी अर्धचंद्राकृती आकाराची आहे. अनेकदा या टेकड्यांचे दोन भाग होतात आणि दोन्ही भाग वेगवेगळ्या दिशेला सरकत जातानाही दिसतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख ही दगडांच्या आजूबाजूला पडत राहते. त्यातून नवे ढीग तयार होत राहतात. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते, असं निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे.

First published:
top videos

    Tags: Africa