पुणे, 15 जुलै : पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. पण, पुणे महानगर पालिकेतील मुख्य जमादार दारु पार्ट्या करत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुणे महानगर पालिकेतील मुख्य जमादार ज्यांच्यावरती पुणे महानगर पालिकेच्या सर्व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असते. तेच सुरक्षा जमादार दररोज महानगर पालिकेत राजरोसपणे दारूच्या पार्ट्या करत असल्याचं समोर आलं आहे.
रवींद्र असं या जमादाराचं नाव आहे. पालिकेच्या आवारातच या जमादाराने दारू पार्ट्या सुरू केल्या होत्या. याची माहिती स्थानिक सेवकांना कळाली. त्यांनी आधी या जमादारीची समजूत काढली पण, त्याने त्यांचं काही ऐकलं नाही. या सेवकांनी जमादाराला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या जमादाराने त्या सेवाकाशी हातापायी करण्यास सुरुवात केली.
दोन दिवसांपूर्वी याच वादातून महापालिकेच्या गेटवरच सुरक्षारक्षकाला कोविड सेंटरवर ड्युटी देण्यावरून हाणामारी झाली होती. त्याचा व्हिडिओ समोर आला होता.
जमादाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला जमादाराने मारहाण करत बाहेर ढकले. या प्रकरणी आता पालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहण्याचे ठरणार आहे.