मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भरधाव महिंद्रा कार डिव्हायडर तोडून बसवर आदळली, भीषण अपघातात 2 ठार

भरधाव महिंद्रा कार डिव्हायडर तोडून बसवर आदळली, भीषण अपघातात 2 ठार

नाशिक-मुंबई महामार्गावर माणकोली नाक्याजवळ मंगळवारी उशिरा रात्री हा भीषण अपघात झाला.

नाशिक-मुंबई महामार्गावर माणकोली नाक्याजवळ मंगळवारी उशिरा रात्री हा भीषण अपघात झाला.

नाशिक-मुंबई महामार्गावर माणकोली नाक्याजवळ मंगळवारी उशिरा रात्री हा भीषण अपघात झाला.

भिवंडी, 15 जुलै : मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली नाका इथं कार - बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण  ठार झाले असून तीन गंभीर जखमी झाले आहे. जखमींमधील  एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्याच्या हद्दीतील माणकोली नाकाजवळ भरधाव कार चालकाचा ताबा सुटून समोरून येणाऱ्या बसवर अदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कार चालक विशाल विनायक भोये (28 रा. नाशिक ) व प्रवाशी अमोल सुरेश वाबळे (28 रा. नाशिक ) हे दोघेजण जागीच ठार तर महिला प्रवाशी शामा देशमुख (39) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी  बेशुद्ध अवस्थेत माणकोली नाका येथील लोट्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दुहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला! चिमुकल्यासमोर आई-वडिलांची निर्घृण हत्या

या अपघाताच्या घटनेचे अधिक वृत्त असे की, अमोल व शामा हे दोघे नाशिकहून कामानिमित्त मुंबईतील नातेवाईकांकडे आले होते. कामकाज उरकून ते भाड्याच्या कारमधून नाशिककडे निघाले होते. त्यावेळी त्यांची कार माणकोली ब्रिज पार करून भरधाव वेगाने जात

असताना भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार  महामार्गावरील  दुभाजकावरून उडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बसवर जाऊन जोरदार आदळली.

त्यामुळे झालेल्या भीषण  अपघातात  कार चालक विशाल आणि प्रवाशी अमोल या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर महिला प्रवाशी शामा या गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पराग भाट हे आपल्या पोलिस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होवून त्यांनी जखमी महिलेला माणकोली येथील लोट्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करीत कार चालक विशाल व प्रवाशी अमोल या दोघांचे मृतदेह भिवंडी येथील ऑरेंज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी  पाठविण्यात आले आहेत.या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहेत.

First published:

Tags: अपघात, भिवंडी